पुस्तक - After Dark (आफ्टर डार्क)
लेखक - Haruki Murakami (हारुकी मुराकामी)
भाषा - English (इंग्रजी)
मूळ पुस्तक - アフターダーク (Afutā Dāku)
मूळ पुस्तकाची भाषा - Japanese (जपानी)
अनुवाद - Jay Rubin (जे रुबीन)
पाने - २०१
ISBN - 978-0-099-50624-9
ह्या कादंबरीला निश्चित अशी गोष्ट नाही. एका रात्रीत घडणाऱ्या घटना आहेत. योगायोगाने एकत्र आलेल्या व्यक्ती एकमेकांशी मोकळेपणाने गप्पा मारतात. आपल्या आयुष्यातला सल किंवा काही दु:ख एकेमेकांना सांगून मन मोकळं करतात. त्यातून आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यातली दुःखद किनार समजते. पण ह्या सगळ्या कोलाज कामातून काही मुख्य आकृतीबंध तयार होत नाही.
कादंबरीच्या सुरुवातीला एका मुलीचं - एरीचं - वर्णन आहे. ती एका खोलीत गाढ झोपली आहे. आहे. तिथल्या टीव्हीचा स्क्रीन थोडा वेगळा आहे. त्या स्क्रीन मधून कोणीतरी तिला बघतंय असं वर्णन आहे. नंतर, एखाद्या वैद्यानिक कल्पनारंजनाप्रमाणे त्या स्क्रीन मधून ती मुलगी एका अनोळख्या ठिकाणी आपोआप जाते. एखाद्या बंद खोली प्रमाणे ती जागा असते. तिकडे तिला जाग येते. आणि कादंबरीच्या शेवटी ती मुलगी पुन्हा मूळ जगात येते, पण इथे पुन्हा ती निद्रिस्तच.
ह्या एरीची बहीण मारी, तिला रात्री एक तरुण - एरीचा शाळूसोबती - भेटतो, ते गप्पा मारतात. तो एका "वेश्याव्यवसाय" चालणाऱ्या हॉटेलात मदतनीस असतो. तिथे एका मुलीला मारहाण होते, तेव्हा हे दोघे मदत करतात. मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या ऑफिसचं वर्णन आहे. असे बरेच प्रसंग घडत राहतात. ते वाचताना खूप कंटाळा येतो तरी आपण वाचत राहतो कारण असं वाटत राहतं की ह्या सगळ्या कड्या एकत्र होऊन शेवटी त्या चमत्काराची उकल होईल असं आपल्याला वाटत राहतं.
पण असं काहीच होत नाही. सगळं अधांतरी सोडून कादंबरी संपते.

काही पाने उदाहरणादाखल
एरीच्या खोलीचं वर्णन.

"मारी"चा मित्र तिला तिच्या आयुष्यातल्या समस्या सांगतो तेव्हा

हॉटेलातली महिला कर्मचारी तिच्यामागे लागलेल्या ससेमिऱ्याबद्दल सांगते.

सगळा वेळ फुकट. मुराकामी च्या बंडल पुस्तकाचा हा दुसरा अनुभव. ह्या आधी वाचलेलं "Colorless Tsukuru Tazaki and His years of Pilgrimage" हे पुस्तक असंच. त्याचं परीक्षण पुढील लिंकवर वाचू शकाल

निरर्थक वर्णन आणि कशाचा कशाला पत्ता नाही. हा लेखक इतका बेस्टसेलर कसा झाला कळत नाहीये! खरं तर काही अर्थ नाही असं लिहून मग "मी स्पष्ट सांगणार नाही, लोकांनी ते शोधावं" असा खेळ मुराकामी ने केला असावा; त्यात लोक गंडले. "काही कळलं नाही" असं म्हणून बावळट ठरण्यापेक्षा "हो हो , खूप मोठा अर्थ आहे" असं म्हणून लोकांनी डोक्यावर घेतलेलं दिसतंय.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————