आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun)



आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन (Amen-the autobiography of a nun)
लेखिका - सिस्टर जेस्मी
अनुवाद - सुनंदा अमरापुरकर

सिस्टर जेस्मी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद खूप छान झाल आहे. मूळ पुस्तकच मराठीत आहे असं वाटतं. कुठेही बोजडपणा आलेला नाही.

एका केरळी भारतीय "नन"ने- तेहेतीस वर्षं कॉन्व्हेंट मध्ये घालवली अनेक अन्याय, अत्याचार सोसत. आणि या अत्याचारांचा अतिरेक झाल्यावर शेवटी कॉन्व्हेंट सोडायचा निर्णय घेतला. आणि त्या तथाकथित सेवाभावी, पवित्र गणल्या गेलेल्या संस्थांमधील गैरप्रकार, अनैतिक लैंगिक संबंध, भ्रष्टाचार, राजकारण, उच्चनीचता, अंधश्रद्धा यांबद्दल लिहिती झाली.

नन होण्याची क्लिष्ट प्रक्रिया क्लिष्ट आहे, कठीण आहे. त्यासाठी वरिष्टांची अज्ञा पाळण्याची शपथ, आणि दारिद्र्याची शपथ घ्यावी लागते. ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित असतं. पण सर्वच नन्स ना ब्रह्मचर्य सांभाळणं जमत नाही त्यामुळे वाढीला समलैंगिक संबध लागलेले आहेत. लेखिकेलाही इतर शिकाऊ नन्स प्रमाणे एखाद्या वरिष्ठ "सिस्टर"(?) च्या अशा भुकेलाही बळी पडावं लागलं. काही "फादर"(?) कडून अत्याचार झाले. आणि येशूची इच्छा, येशू मार्ग दाखवेल अशा अंधविश्वासापोटी तीला सगळं सोसावं लागलं.

लेखिका हेही सांगते की चर्च मध्येही ननच्या सामाजिक आणि सांपत्तिक स्थितीनुसार नन्सम्ध्ये भेदभाव केला जातो. खालच्या दर्जाच्या नन्सना (ज्यांना चेडुथी म्हणतात) फक्त राबवलं जातं शारिरिक श्रमांसाठी.  पुरुष सभासद (फदर, ब्रदर) यांच्या तुलनेत महिलांना खूपच कष्टची कामं करावी लागतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही कमी मिळतं

सेवेच्या नावाखाली चालवलेल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, डोनेशन कसं उकळलं जातं आणि त्याला विरोध करणाऱ्या सज्जन लेखिकेला शारिरिक मानसिक छळाला तोंड द्यावं लागलं, अपप्रचाराला तोंड द्यावं लागलं, इतकंच काय तीला वेडं ठरवण्याचा प्रयत्न "मदर"(?), "फादर(?)" यांनी केला.

विशेष म्हणजे लेखिकेकेने ज्या मुद्द्यांना हात घातला आहे त्या समस्यांचं निराकरण करण्याऐवजी चर्चमात्र लेखिकेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला खोटं पाडण्याच्या उद्योगातच आहे.

चर्च, कॉन्व्हेंट आणि इतर धार्मिक संस्थांवर आंधळेपणाने विश्वास टाकणाऱ्या, धर्मांतरित होणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे पुस्तक आहे. तसंच हिंदूधर्म आणि इतर भारतीय धर्मांतच ज्यांना फक्त वाईट दिसतं त्यांना विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...