पुस्तक :- तत्त्वमसि /તત્ત્વમસિ / tattvamasi
लेखक :- ध्रुव भट्ट ધ્રુવ ભટ્ટ/ Dhruv Bhatt
भाषा :- गुजराती / ગુજરાતી / Gujarati
पाने :- २३२
सरांच्या ओळखीने तो नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातल्या आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो. आदिवासींचं जीवन त्याला जवळून पहायला मिळतं.
आदिवासी दगडाला, झाडांना देव मानणारे. या अडाणीपणाचा त्याला राग येतो. पण या निबिड अरण्यात राहताना या श्रद्धाच कश्या बळ देतात हे त्याला उमगतं. आदिवासी एकेमेकांना कशी साथ देतात, प्रामाणिकपणे व्यवहार करतात, परंपरेने आखून दिलेल्या मार्गावर कसे निष्ठेने चालतात हे त्याला अनुभवायला मिळतं.
हे आदिवासी नर्मेदेला देवी मानणारे. नर्मदेच्या जंगलात नर्मदा परिक्रमा करणऱ्या "परिकम्मा"वासींची जशी जमेल तशी सेवा करण्यात समाधान मानणारे. परिक्रमेबद्दल जेव्हा त्याला कळतं तेव्हा एका नदीला प्रदक्षिणा करणं म्हणजे त्याला मागासपc वाटतो. पण परिक्रमावासी आणि आदिवासी केंद्रातले काही जाणते लोक यांच्या मुळे त्याला कळतं की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाद्वारे सर्व प्रदेशातले लोक कसे परस्परांना भेटतात, ज्ञानाची देवाण्घेवाण होते. आसेतुहिमाचल पसरलेल्या या भूप्रदेशात आचार-विचार-उपासना पद्धती इतक्या भिन्न आहेत पण त्यामागचा आत्मा,मूल्य मात्र समान आहेत.
नर्मदा प्रदक्षिणा करणाऱ्यांना नर्मदा भेटते म्हणे; पण ते भेटणं सांगून कळणारं नाही. दुसऱ्याला दाखवतो म्हणून दाखवता येणारं नाही. मनात श्रद्धा ठेवून परिक्रमा करतानाच ते अनुभवायला हवं हे त्यालाही उमगतं आणि त्यालाही अनुभवायला मिळतं.
असा एकूण पुस्तकाचा अवाका आहे. त्यातले प्रत्यक्ष प्रसंग सांगून तुमची मजा घालवत नाही. पण आदिवासींबद्दल आपल्यालाही वस्तुनिष्ठ विचार करायला लावणरी ही कादंबरी आहे. लेखक भारतीय संस्कृतीच्या, रीतीरिवाजांच्या आणि महानतेच्या प्रेमात आहे हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे पुस्तकात भारतीय संस्कृतीबद्दल महान, गोडगोड असंच वाचायला मिळतं. बऱ्यावाईटाचा साक्षेपी ऊहापोह नाही. तरी काही पैलू नव्याने सापडू शकतील.
एक कथा म्हणून कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवादही उपलब्ध आहे. अंजली नरवणे यांनी तो केला आहे. ------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment