पुस्तक : काचेपलीकडचे जग (kAchepalikadache jag)
लेखक :विद्याधर म्हैसकर (Vidyadhar Mhaiskar)
भाषा :मराठी (Marathi)
पाने : २३८
ISBN : दिलेला नाही
"आत्मनिर्भर" हा सध्या चर्चेत असलेला शब्द आहे. आत्मनिर्भर असणं, स्वावलंबी असणं हे कुठल्याही देशासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे स्वदेशीची चळवळ आपल्या देशात बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातही स्वराज्य, स्वदेशी,राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी चतु:सूत्री आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी सांगितली होती. लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तत्कालीन तरुणांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली होती. क्रांतिकार्य, समाजकार्य आणि शिक्षणकार्यात भाग घेतला होता. तर काहींनी स्वदेशी उद्योग सुरू करून या पुनरूत्थानाला गती दिली होती. ओगले ग्लास वर्क हा असाच ध्येयवादाने प्रेरित झालेल्या तरुणांचा अभिनव आणि यशस्वी उपक्रम होता.
ओगले कुटुंबातल्या तरुणांनी या उद्योगाची स्थापना केली. औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी त्यांना जागा आणि भांडवल उपलब्ध करून दिलं. आणि काही महिन्यांतच परदेशी काचेच्या तोडीस तोड काच महाराष्ट्रात बनू लागली. पूर्वी घरोघरी दिसणारे "प्रभाकर" ब्रँडचे कंदील हे त्यांचं लोकप्रिय उत्पादन. या उद्योगाच्या संस्थापकांच्या तिसऱ्या पिढीतले विद्याधर म्हैसकर यांनी या उद्योगाच्या सुरुवातीची आणि पहिल्या पंचवीस वर्षांच्या वाटचालीची वाटचालीची वाटचालीची कहाणी सांगितली आहे या पुस्तकात सांगितली आहे आहे. ओगले कुटुंबातल्या व्यक्ती गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत असे पुस्तकाचे स्वरूप आहे. त्यांच्या आठवणीतून कथनातून हा सगळा प्रवास उलगडतो.
जागेचा प्रश्न राजाश्रयामुळे सुटला आणि पुढची लढाई सुरू झाली. उजाड माळरानावर असलेला निवडुंग साफ करून ती जागा वसतीयोग्य करण्यापासून सुरुवात होती. गावापासून दूर असल्यामुळे आजूबाजूला जे लोक उपलब्ध होते त्यांनाच घेऊन, मार्गदर्शन करत, शिकवत, त्यांच्या चुका सांभाळत कारखान्याची उभारणी सुरू झाली झाली. त्या दिवसांबद्दलच्या आठवणी जरा बघा.
ओगले बंधूंपैकी एक जण काच निर्मिती तंत्रज्ञान तंत्रशाळेतून शिकून आले शाळेतून शिकून शाळेतून शिकून आले होते पण त्याच ज्ञानावर थांबणं हे काही त्यांच्या स्वभावात नव्हतं या तंत्रज्ञानात नवं काय काय घडत आहे आपल्याला समजलं पाहिजे आपल्या कारखान्यात ते आलं आलं आपल्या कारखान्यात ते आलं आलं पाहिजे हा त्यांचा ध्यास कायम राहिला कायम राहिला तू नच त्यातूनच परदेशी मालाला टक्कर देऊ शकेल अशी काच तयार झाली. काचेची निरनिराळी उत्पादने आणि जोडउत्पादनांची भरभराट झाली. त्याबद्दलचा हा एक प्रसंग पहा.
"ह्यूमन रिसोर्सेस" हा हल्लीच शब्द कदाचित त्यावेळी रुळलेलाही नसेल पण ओगल्यांसाठी त्यांचे कामगार, अधिकारी हे ह्यूमन रिसोर्सेस होते. आपल्याकडे काम करणाऱ्या, कामगार वस्तीतल्या रहिवाशांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. त्यामुळे एका माळरानाचे एका औद्योगिक वसाहतीत रूपांतर झालं.
पुस्तकातल्या कथनाच्या प्रवाहात फक्त ह्या उद्योगाचीच नाही तर ओगले कुटुंबीयांमधल्या परस्पर स्नेहाची आणि त्या वेळच्या परिस्थितीची सुद्धा नकळत ओळख होते. एका प्रसंगात सोन्याचा हार पोस्टाने मागवला हार पोस्टाने मागवला होता याचा उल्लेख आहे! इतका इंग्रजी व्यवस्थेवर विश्वास होता. गावोगावी डॉक्टर तेव्हा उपलब्ध नव्हते. साध्या सध्या उपचारांसाठीही दुसऱ्या गावी जाऊन औषध आणायचं किंवा दुसऱ्या गावावरून डॉक्टर येणार अशी परिस्थिती. ओगले कुटुंबातील ज्येष्ठ- प्रभाकर ओगले (ज्यांनी आयुर्वेदावर "चिकित्सा प्रभाकर" हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे) त्यांचा हा किस्सा वाचा.
ओगल्यांनी आपल्या उत्पादनांत विविधता आणली तसाच व्य्वसायाचा भौगोलिक विस्तारसुद्धा केला. नागपूर, म्हैसूर, केरळ आणि श्रीलंकेत सुद्धा त्यांचा कारखाना सुरू झाला. महाराष्ट्राला, मराठी माणसाला अभिमानास्पद आणि मार्गदर्शक अशी ही कहाणी आहे आणि ती सांगितली सुद्धा आहे समर्पक रोचक-रंजक शैलीत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे या उद्योगाचा पुढचा प्रवास कसा झाला हे वाचायची उत्सुकता आपल्याला लागते. लेखकाकडून हा पुढचा भाग लिहून झाला तर मजा येईल.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment