जिथली वस्तू तिथे (Jithali vastu tithe)

 




पुस्तक : जिथली वस्तू तिथे (Jithali vastu tithe)
लेखिका : मंगला गोडबोले (Mangala Godbole)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १२६
ISBN :
978-81-86149928
प्रकाश : मेनका प्रकाशन


मागच्या महिन्यात मी स्टोरीटेल या appचं सशुल्क सदस्यत्व घेतलं.या appवर खूप मराठी कथा, कादंबऱ्या, पुस्तके ध्वनिमुद्रित केलेली आहेत. ज्यांना साहित्य वाचायची इच्छा आहे पण प्रत्यक्ष वाचन करणं काही कारणामुळे जमत नाहीये त्यांना हा पर्याय चांगला आहे. पुस्तकांनाचं वाचन, ध्वनिमुद्रण, पार्श्वसंगीत हे सगळं यथायोग्य आणि आकर्षक आहे. मी या अँपवर काही कथा ऐकल्या. काही पुस्तकं वाचायला सुरुवात केली पण अजून पूर्ण झाली नाहीत. 

सगळयात पाहिलं पुस्तक जे उत्सुकतेने ऐकून पूर्ण केलं ते मंगला गोडबोले यांचं "जिथली वस्तू तिथे". मंगला ताईंच्या नेहमीच्या खुसखुशीत विनोदी शैलीतल्या कथा आहेत. मध्यमवर्गीय घरात घडणाऱ्या प्रसंगांची खुमासदार वर्णनं ऐकताना "अरेच्च्या, सगळ्या घरी असंच घडतं; फक्त आपल्याकडेच घडतं असं नाही" असं वाटून गंमत येते.
 



कथा वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित आहेत. 
- नव्या सुनेसाठी सगळं "मॉडर्न" करणाऱ्या आणि स्वतःलाही "मॉडर्न" बनवणाऱ्या सासूची घालमेल 
- हल्लीच्या मुलांना भरमसाठ वस्तू घ्याची सवय आहे पण वस्तू जागेवर ठेवायची सवय नाही; ह्या मुलांचं लग्न झाल्यावर कसं होणार याची आईवडिलांना वाटणारी काळजी 
- कॉलेजकुमाराचं कॉलेजकुमारीवर प्रेम बसलं पण पुढे काही झालं नाही. तो साधा माणूस राहिला, ती अभिनेत्री झाली. दोघांचं आयुष्य वेगवेगळ्या वाटेने गेलं. पण आपण एकेकाळी मित्र होतो ही आठवण आणि ती दाखवायची खुमखुमी मात्र चालूच राहिली. त्यातून होणारी फजिती 
- ऐकू कमी येणाऱ्या आजी आणि विस्मरण होणारे आजोबा असं जोडपं. त्यांच्या घरी आजोबा कोणालातरी जेवायला बोलावतात आणि विसरून जातात. ते आठवण्याची धमाल 
- लग्न ठरवताना बघायच्या कार्यक्रमात एकमेकांवर इम्प्रेशन पाडायची चढाओढ चालू असताना मुलाची आजी अतिउत्साहाच्या भरात काय काय सांगून बसेल याची भीती. त्यामुळे तिला आवर घालताना होणारी दमछाक 
इ. 






मानसी जोशी यांचं अभिवाचन अगदी साजेसं आहे 

अँप वर पुस्तक अर्धवट आहे. शेवटच्या ४ कथा नाहीत. पण त्यांनी पुढचा भाग प्रकाशित केल्यावर किंवा पुस्तक मिळेल तेव्हा त्या वाचायची उत्सुकता आहे. तुम्हाला सुद्धा या गोष्टी वाचायला किंवा ऐकायला नक्की आवडतील.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...