पुस्तक - क्रिककथा दिवाळी अंक २०२२ (Crickatha Diwali Edition 2022)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ११२
ISBN - दिलेला नाही
भारतीयांचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट बघायला; त्याच्या बातम्या वाचायला; कात्रणं गोळा करायला; आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर भरभरून बोलायला बहुतेक लोकांना आवडतं. क्रिकेटशी वेगवेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याचं अजून एक साधन आता उपलब्ध होत आहेते म्हणजे क्रिकेट विषयक दिवाळी अंक- "क्रिककथा". या दिवाळी अंकात म्हटल्याप्रमाणे हा मराठीमधला क्रिकेट विषयक एकमेव दिवाळी अंक आहे. हे या अंकाचे दुसरे वर्ष आहे. क्रिकेट विषयक माहिती आणि मनोरंजक पैलूंनी भरगच्च असा हा दिवाळी अंक आहे.

अनुक्रमणिकेवरती एक नजर टाकूया.

लेखांमध्ये जुन्या क्रिकेटपटूंच्या आठवणींना, त्यांच्या विक्रमांना तसेच शैलींना उजाळा दिला आहे. तसेच सध्या गाजत असलेल्या क्रिकेटपटू बद्दलही लेख आहेत. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट, महाराष्ट्राची तरुण फळी, भारतीय महिला क्रिकेट मधल्या उभरत्या ताऱ्यांवरही लक्ष आहे. पाचगणी प्रीमियर लीग सारख्या हटके उपक्रमाची माहिती आहे.
क्रिकेटचा सामना यशस्वी होण्यासाठी खेळाडूंबरोबरीनेच अनेकांचा सहभाग महत्त्वाचा असतो. प्रत्यक्ष क्रिकेट न खेळणारे पंच म्हणजे अंपायर, मॅच रेफ्री, खेळपट्टी तयार करणारे, स्कोर लिहिणारे, समालोचक इ. यातील मॅच रेफरी, क्रिकेट अंपायर आणि क्रिकेट स्कोरर यांच्या बद्दलचे, त्यांचं काम काय असतं हे सांगणारे छान लेख आहेत.
इतर दिवाळी अंकाप्रमाणे शब्दकोडे कविता सुद्धा यात आहेत.पण तेही क्रिकेटवर आधारित. गंमत म्हणजे भविष्य सांगणारा एक सदरही आहे. ह्यात रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या फॉर्म बद्दल;आयपीएल मध्ये कोण जिंकेलइ. बद्दल भविष्यवाणी केली आहे.
क्रिकेट ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून पुण्यात चालवला जाणाऱ्या "क्रिककॅफे" ची सचित्र माहिती या मासिकात आहे. या मासिकाच्या निमित्ताने बऱ्याच व्यक्तींनी आपल्या मुलाखती दिल्या आहेत त्या मुलाखती youtube वर उपलब्ध आहेत त्या बघण्यासाठीचे क्यूआर कोड मासिकात आहेत.
काही काही लेखांवर नजर टाकूया.

मॅचरेफ्रि च्या कामाबद्दलच्या लेख

उभारता तारा शार्दुल ठाकूर यांच्या वाटचालीबद्दल त्याच्या वडिलांची साधलेला संवाद

मागच्या पिढीतले कर्तृत्ववान पण कमी कालावधी क्रिकेट खेळू शकलेले सुभाष गुप्ते यांचं स्मरण

प्रत्यक्ष खेळापेक्षा क्रीडाबाह्य कारणांसाठी गाजणाऱ्या आयपीएलच्या नकारात्मक बाजूचा मागवा

तेंडुलकर वेंकसरकर, गावस्कर इत्यादी आडनाव नावात "कर" असणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय क्रिकेटपटूंचा संघ तयार करायचा असेल तर त्यात कोणाला घेणार? अशा मजेशीर कल्पनेवर आधारित एक लेख त्यात लेखकाने 11 करांची निवड केली आहे आणि त्यांच्या कारकिर्दी बद्दल थोडक्यात सांगितलं आहे

असा हा अंक वैविध्यपूर्ण आणि क्रिकेट प्रेमींसाठी रोचक रंजक आहे.
हा अंक डिजिटल स्वरूपात ही उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी https://crickatha.com/ ला भेट द्या.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-क्रिकेटप्रेमींनी आवा ( आवर्जून वाचा )

इतरांनी वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————