Tales from the heart (टेल्स फ्रॉम द हार्ट)




पुस्तक - Tales from the heart (टेल्स फ्रॉम द हार्ट)
लेखिका - शिल्पा सरदेसाई (Shilpa Sardesai)
भाषा - इंग्रजी (English)
पाने - १११
प्रकाशन - स्वयंप्रकाशित
ISBN - 978-8-88935-953-1


पुस्तकाच्या लेखिका शिल्पा सरदेसाई ह्यांनी स्वतःहून हे पुस्तक मला पाठवून माझा अभिप्राय विचारला ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


हा लघुकथासंग्रह आहे. 
सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात घडणारे प्रसंग ह्या गोष्टींत आहेत. त्या त्या प्रसंगात कथेतल्या मुख्य पात्राला काय वाटलं किंवा त्या घटनेतून त्या पत्राने काय बोध घेतला ह्यांचं निवेदन असं साधारण स्वरूप आहे. प्रसंग अगदीच साधे आहेत. त्यात काही नाट्य नाही.
उदा. एक जोडपं सुट्टी घेऊन त्यांच्या लहान मुलाबाबरोबर समुद्रावर जातं. पाण्यात खेळतं. मुलांबरोबर वाळूचा किल्ला बनवतात. संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना वाटतं की खरंच असं सुट्टी घेऊन आलं पाहिजे.
एक गृहिणी घरात आवरा यावर करते. घरातल्याच वस्तू पण त्या नव्या पद्धतीने मांडते. काम करून दमली तरी आपल्या मनासारखं घर लावून झाल्यावर खुश होते. आणि मग हा आनंद ती पुन्हा पुन्हा घेते.

असं फारच सरळधोपट आहे. काही काही कथांमध्ये त्या प्रसंगातून "जीवनाचं सार", "जगण्याच्या टिप्स" वगैरे काढून जरा तात्त्विक वजन आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण तो फारच ओढून ताणून केल्यासारखा आहे.
एकदोन कथांमध्ये थोडं नाट्य आहे उदा. नवरा-बायकोचं भांडण होत राहतात. सरतेशेवटी बायको कंटाळते. पण ती त्याला सोडून न जाता "तो असाच आहे" हे स्वीकारते आणि खुश राहते. अशी गोष्ट आहे पण ह्या सगळ्यांत दोघांच्या मनातली आंदोलनं टिपण्यात लेखिका कमी पडते.
दुसरी एक अनाथ मुलाची कथा आहे जी एकमेव कथा ज्यात थोडं नाट्य थोडी उत्कंठा वाटेल असं काही घडलं. पण तिथेही रंग भरण्यात लेखिका कमी पडली आहे.



काही पाने उदाहरणा दाखल
वर म्हटलेली नवरा बायकोची कथा



आवाराआवरीची गोष्ट



लहान मुलीबरोबर तुकड्याचं कोडं (जिगसॉ पझल) सोडवताना शोधलेले तत्त्वज्ञान




गोष्टींमध्ये प्रसंग नेहमीचेच असले की पुढे काय घडेल ह्याचा अंदाज सर्वसाधारणपणे वाचकाला असतोच. त्यामुळे अश्या गोष्टींत "काय" घडतंय ह्यापेक्षा कसं घडतंय, पात्रं काय विचार करतायत, काय संवाद बोलतायत, ते संवाद किती प्रभावी आहेत; निवेदकाची शैली कशी आहे; ती विनोदी असेल किंवा गंभीर पण प्रसंग डोळ्यासमोर उभी करणारी आहे का ह्या सगळ्यातून गोष्टी खुमासदार, रंजक, प्रभावी इत्यादी होतात. त्याचा अभाव पुस्तकात जाणवतो. त्यामुळे मला हे पुस्तक आवडलं नाही. 
पण लेखिकेने लिहीत राहावं. त्यांच्या पुढील लेखनासाठी खूप शुभेच्छा !

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

निकोला टेस्ला (Nikola Tesla)

पुस्तक - निकोला टेस्ला (Nikola Tesla) लेखक - सुधीर फाकटकर (Sudhir Phakatkar) भाषा - मराठी (Marathi) पाने - १८६ प्रकाशन - राजहंस प्रकाशन. मे ...