Chart Throb (चार्ट थ्रोब)




पुस्तक :- चार्ट थ्रोब (Chart Throb)
लेखक :- बेन एल्टॉन (Ben Elton)
भाषा :- इंग्रजी


भारतीय टिव्ही वाहिन्यांवर वेगवेगळे "रिअलिटी शो" नेहमी चालू असतात. "सारेगम","डान्स इंडिया डान्स","बिग बॉस","फियर फॅक्टर" ई. यातल्या बहुसंख्य कार्यक्रमांची मूळ संकल्पना कुठल्या ना कुठल्या अमेरिकन/ब्रिटिश कार्यक्रमावरून उचललेली असते. या सर्व कार्यक्रमात स्पर्धेच्या मूळ कौशल्याइतकच (गाणं /नाच/अभिनय यांच्या इतकच) दाखवलं जातं ते म्हणजे नाट्य. रडणारे स्पर्धक, पंचमंडळीमधली भांडणं, स्पर्धकांमधले रुसवेफुगवे आणि द्वेष-मत्सर. 
कार्यक्रम बघताना एक जाणवतं की हे कार्यक्रम "रिअलिटी शो" म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात "रिअलिटी"- वास्तवतेपासून फारच दूर असतात.

हे खरंच असं का आणि कसं होतं याचा पर्दाफाश करणारी, "रिअलिटी शो"ची हीच "रिअलिटी" दाखवणारी "चार्ट थ्रोब" ही सुंदर कादंबरी आहे.

"चार्ट थ्रोब" नावाच्या पॉप संगिताच्या स्पर्धेचा हा कार्यक्रम कसा बनवला जातो याचं यथार्थ वर्णन यात आहे. स्पर्धा गाण्याची पण स्पर्धकांची निवड त्यांना गाणं येतंय का नाही यावर होत नाही तर कोण अधिक मनोरंजक आहे - स्वभावमुळे, दिसण्यामुळे, शारिरिक वैगुण्यामुळे  - हे महत्त्वाचं ठरतं.  अशा लोकांच्या वेगवेगळे प्रकार पाडले जातात. ब्लिंगर्स, मिंगर्स, क्लिंगर्स.आणि दिग्दर्शक म्हणत असतो की "we do not want singers. We want blingers, clingers, mingers". :)

कोणाला कुठल्या फेरी पर्यंत स्पर्धेत ठेवायचं, कुणाला पंचांनी काय सल्ला द्यायचा, कुणाला कसं रडवायचं, कुणाला कसं चढवायचं, कुणाला कसं पाडायचं,  हे सगळं दिग्दर्शक ठरवणार. एखाद्याला लोकप्रिय करायचं असेल तर त्याला सेक्सी दिसेल असे कपडे घालायचे तर दुसऱ्याला लोकांना नावडतील असे कपडे घालायला द्यायचे. त्यांना वादग्रस्त संवाद द्यायचे जेणेकरून लोकभावनाही "मॅनेज" करता येतील.  

अशा एक ना अनेक पडद्यामागच्या गोष्टी आपल्याला लेखक दाखवतो. दिग्दर्शकाचं एक वाक्य आपल्या नेहमी लक्षात राहतं "Remember, we are not "talent"show. We are "entertainment" show".

तुम्हाला "रिअलिटी शो" आवडत असतील किंवा नसतील पण त्या मागची प्रक्रिया कादंबरीरूपात वाचायला नक्कीच आवडेल

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )

------------------------------------------------------------



----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...