पुस्तक :- भोकरवाडीतील रसवंतीगृह (BhokarawadItIl RasavantIgruh)
भाषा :- मराठी (Marathi)
लेखक :- द.मा. मिरासदार (D.M. Mirasdar)
पाने :- १४८
द.मा. मिरासदार हे मराठीतले प्रसिद्ध आणि लोकप्रिय कथालेखक. त्यांच्या ग्रामिण विनोदी कथा तर खूपच मनोरंजक आहेत. त्यामुळे त्यांच्या कथासंग्रहाचं परीक्षण लिहिण्याची गरज नाही. फक्त हे पुस्तक मी वाचलं याची नोंद म्हणून ही ब्लॉगपोस्ट.
कथांमधे भोकरवाडी गावातली बाबू पैलवान, नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, शिवा जमदाडे, आनशी, बाबूची बायको, गणामास्तराची बायको, बंडू पुजारी अशी पात्रं आणि वल्ली आपल्याला भेटतात. दोनतीन कथा वाचल्या की आपलीपण त्यांच्याशी चांगलीच ओळख होते आणि पुढच्या कथेत ही मंडळी काय गमती जमती करतात याची उत्सुकता लागते.
कथांमध्ये वेगवेगळे प्रसंग आहेत - आणिबाणीतला गणेशोत्सव, गणपती दूध पितो तो चमत्कार, भूकंप होणार अशी अफवा उठते तेव्हा, बाबू गवाला बिबट्या वाघाची भिती दाखवतो गावाच्या तालमीची दुरुस्ती इ.
जास्त काही सांगण्यात काही मजा नाही. वाचण्यातच मजा आहे.
------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment