स्वामी विवेकानंदांची बोधवचने (Swami Vivekanandanchi Bodhavachane)




पुस्तक : स्वामी विवेकानंदांची बोधवचने (Swami Vivekanandanchi Bodhavachane)
संकल्पना : रामकृष्ण बुटेपाटील (Ramkrushna Butepatil)

मोडी लिप्यंतर : नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)
ISBN : 978-81-935383-0-2

मोडी लिपी शिकण्यासाठीच्या पुस्तकाची ओळख मी काही दिवसांपूर्वी करून दिली होती. 

या पुस्तकाचे लेखक नवीनकुमार माळी हे मोडी प्रचारासाठी समर्पित वृत्तीने कम करत आहेत. मोडी शिकणाऱ्यांना वाचन सराव करता यावा यासाठी मोडीत पुस्तके असावीत यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मोडी लिपीतील पहिले ई-पुस्तक त्यांनी प्रकाशित केले होते. त्याची ओळखही मी माझ्या ब्लॉगवर करून दिली होती. 

मोडी लिपीतील पहिले ईबुक आणि मोडीलिपीचा फाँट तयार करण्याचा प्रवास


या प्रयत्नमालेतले पुढचे पुष्प त्यांनी आता गुंफले आहे. "स्वामी विवेकानंदांची बोधवचने" हे पुस्तक १२ जानेवारी अर्थात विवेकानंद जयंतीच्या सुदिनी प्रकाशित झाले अहे. विवेकानंदांचीही ओळख कुणाला करून द्यायची गरज नाहीच. आणि नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेलच की हा बोधवचनांचा संग्रह आहे. त्यामुळे यावेळी हे परीक्षण अगदी थोडक्यात. पुस्तकाचे वैशिष्ट्य फक्त सांगतो.

या पुस्तकात विवेकानंदांची बोधवचने देवनागरी आणि मोडी अशा दोन्ही लिपींत दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी या पुस्तकाच्या ईबुक आवृत्तीचेही प्रकाशन २७ फेब्रुवारीला अर्थात मराठी भाषा दिनी झाले आहे.
ईबुक गूगल प्ले बुक्स वर मोफत डाऊनलोड करून वाचता येईल त्यासाठी लिंक 


ही २२ पानी पुस्तिका आहे. स्वामीजींच्या बोधवचनातून ज्ञान आणि मोडी वाचनाचा सराव असा दुहेरी फायदा अहे. बोधवचने देवनागरी लिपीतही असल्याने अजून मोडी न येणाऱ्यांनाही वाचता येईल.
नमुना म्हणून ईपुस्तकातील एक पान : 





------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी 
मोडी शिकणाऱ्यांसाठी  :- आवा ( आवर्जून वाचा )  
इतरांसाठी :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------------


---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany)

पुस्तक - तौलनिक लोकमान्य (Taulanik Lokamany) लेखक - चंद्रशेखर टिळक (Chandrashekhar Tilak) भाषा - मराठी (Marathi) पाने - १२८ प्रकाशन - भाग्य...