पुस्तक : वेगळं जग (Vegale Jag)
लेखक : गंगाधर गाडगीळ (Gangadhar Gadgil)
भाषा : मराठी
पाने : ३५० (छोट्या वहीच्या आकाराची)
लेखक : गंगाधर गाडगीळ (Gangadhar Gadgil)
भाषा : मराठी
पाने : ३५० (छोट्या वहीच्या आकाराची)
ISBN : 978-81-7185-481-3
मराठी नवकथेचे अध्वर्यू गंगाधर गाडगीळ यांचा हा कथा संग्रह आहे.
कथा छान आहेत, साध्या सोप्या सरळ आहेत. १९५०-६० च्या आसपासचा मध्यमवर्गीय, पांढरपेशा, सवर्ण समाज ही त्यांची पार्श्वभूमी आहे. आशा समाजातली तरुण मुले-मुली आणि मध्यमवयीन स्त्री-पुरुष त्यांच्या कथेचे नायक नायिका आहेत. त्यातल्या काही लक्षात राहणाऱ्या कथांचा गोषवारा.
- वेगळं जग - कारकुनांमधला एक काहितरी घोटाळा करतो आणि त्याने घोटाळा केल्याचा राग, त्याला हे जमलं आणि पैसे मिळवले याची असूया आणि त्याच्या धीटपणाचं कौतुक आशा मिश्र भावनांचं चित्रण
- दामले आणि पळसुले - आपल्या सुरक्षित कोशात राहणाऱ्या पापभिरू मित्र. आपलं चाकोरीबद्ध आयुष्य बदलण्याची शक्यतेने सुद्धा घाबरण्याची त्यांची गोष्ट
- दारिद्र्याचे मनोरथ - उच्च शिक्षण घेऊन काहीतरी करून दाखवायची इच्छा पण त्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता नसणाऱ्या एका गृहस्थाची गोष्ट
- पंख गाळलेले फुलपाखरू - परिपूर्ण संसार असणाऱ्या मध्यमवयीन अनसुयाबाई आणि त्यांचे शेजारी नावापरिणित जोडपं. संसार करून झालेल्या बाई आणि संसार सुरू करणारे ते. या दोन टोकांचा एकमेकांशी संपर्क आल्यावर भावनांची झालेली देवाणघेवाण.
- विळखा - सगळे आपल्याशी फटकून वागतायत असा समज झालेल्या एक प्रौढ शिक्षिका. त्या लोकांशी जवळीक साधायचा कसा प्रयत्न करतायत आणि सगळं नीट बोलूनही नाती जुळता जुळता कशी तुटतात याची गोष्ट
- काळजी - एका लहानग्याच्या निरागासतेचं सुंदर वर्णन आणि त्या निरागासतेला अजून हवाहवासा करणारा कथांत.
- झिंगलेली माणसं - साहित्यप्रांतात रमणारे, पण व्यावहारिक जगात नापास ठरणाऱ्या लेखकाची गोष्ट
- "अर्धवट प्राणी", "भाबडा" - बावळट म्हणून एखाद्याला मदत करावी आणि त्या बावळटपणामागे धूर्तपणा आहे की काय अशी शंका यावी असे प्रसंग घडावेत तर काय होईल याची गोष्ट.
- तिसऱ्या वर्गाचा डबा - रेल्वेच्या डब्यात घडणाऱ्या नित्य घटनांचं शब्दचित्र
- गुलाबी संध्याकाळ - प्रेमात पडलेल्या जोडप्याच्या मनाचे हेलकावे. दुसऱ्याचं आपल्यावर प्रेम आहे का नाही आणि आपण तरी याच्यावर प्रेम करतो का नाही; आणि करतो ते का करतो. प्रसंगा प्रसंगात हे चाचपून बघणाऱ्या जोडप्याची गोष्ट
- वृष्टी - एखाद्या लेखकाला, कवीला कल्पना सुचते, अर्धवट सुचते तेव्हा कशी तगमग होते, त्या पात्रांशी कसा संवाद होतो, झटापट होते त्याची कथा.
- पराजित - नवीन लेखकाला आपलं लिखाण छापून यावं, लोकांनी वाचावं त्याची चर्चा व्हावी अशी इच्छा एकीकडे आणि त्याच्या विरुद्ध वर्तन जगाचं. वाईट लिहिणाऱ्यांना प्रसिद्धी मिळते आणि आपल्याला लोक डावलतात ही त्याची भावना. नवीन लेखकाची घालमेल दाखवणारी गोष्ट.
"पंख गाळलेले फुलपाखरू" मधील एक प्रसंग :
कथांमध्ये घडणारे प्रसंग अगदी रोजच्या आयुष्यात घडणारे आहेत. त्यात खूप विनोदी, भावव्याकुळ करणारं, कल्पनारंजक, गूढ असं नाही. पण तरीही कथा कंटाळवाण्या अजिबात नाहीत. पुस्तक पन्नास वर्षांपूर्वीचं असलं तरी भाषा आजही तितकी जुनाट वाटत नाही. पल्लेदार वाक्य, उपदेशाचे डोस पाजायची हौस असं काही दिसत नाही. थोडे अपवाद सोडले तर खूप अलंकारिक प्रसंगवर्णनं नाहीयेत. सरळ पण प्रभावी भाषेत प्रसंग उभे केले आहेत आणि त्या साध्या साध्या प्रसंगातून माणसांच्या मनात डोकावयाचा प्रयत्न केला आहे.
वाचायला मजा येते. पुढची पुढची कथा वाचत रहाविशी वाटते. एकाच बैठकीत बर्याच कथा वाचून होतील.
वाचायला मजा येते. पुढची पुढची कथा वाचत रहाविशी वाटते. एकाच बैठकीत बर्याच कथा वाचून होतील.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

No comments:
Post a Comment