पुस्तक : थर्ड अंपायर (Third Umpire)
लेखक : द्वारकानाथ संझगिरी (Dwarkanath Sanzgiri)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २७०
ISBN : दिलेला नाही
द्वारकानाथ संझगिरी (https://www.facebook.com/dwarkanath.sanzgiri/) यांना आपण कदाचित मराठी दूरदर्शन वाहिन्यांवरच्या क्रिकेट बद्दलच्या चर्चेत पाहिलं असेल. त्यांचे लेख सामना, लोकसत्ता किंवा इतर वृत्तपत्रांत वाचले असतील. हे पुस्तक त्यांच्या क्रिकेट बद्दलच्या पूर्वी प्रकाशित झालेल्या निवडक लेखांचा संग्रह आहे.
अनुक्रमणिका :
फोटोंवर क्लिक करून झुम करून वाचा
अनुक्रमणिका पाहून लक्षात आलंच असेल की लेखांचं ७ भागात वर्गीकरण केलं आहे. ते असे
होम ग्राउंड - क्रिकेट खेळाडूंच्या घरांना संझगिरी यांनी भेट दिली आहे. अनेक खेळाडूंच्या परिवाराशीही त्यांची चांगली ओळख आहे. कुटुंबाने खेळाडूवर कसे संस्कार केले हे जाणून घ्यायलाही लेखकाला आवडतं. अशा अनुभवांवरचे हे लेख. उदा. व्हिव्हिअन रिचर्डस यांच्या घराला भेट दिली त्याचे वर्णन.
पालणा हलताना - यशस्वी खेळाडूंच्या क्रिकेट क्षेत्रात पदार्पण होत असताना ते कुठे खेळले, कसे खेळले, तो खेळ बघून तत्कालीन लोकांच्या प्रतिक्रिया आणि भकितं काय होती याचा मागोवा घेणारे लेख. उदा. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिनच्या रणजी पदार्पणाचा हा अनुभव.
माजी मास्टर्स - नावावरून्च लक्षात येत असेल की क्रिकेट मधल्या दिग्गज खेळाडूंचे गुणवर्णन करणारे हे लेख आहेत. ब्रॅडमन, विश्वनाथ, मेंडीस, कुंबळे, देवधर इ. वर लेख आहेत.
विक्रमांच्या जगात - क्रिकेट जगतात धवा, बळी, शतके, विजय, पराजय यांमध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित केले जात असतात, जुने मोडले जात असतात. असे महत्त्वाचे विक्र्म जे गेल्या कही वर्षांत घडले त्या घटनांचे वर्णन करणारे लेख. उदा. मुरलीधरन वरचा "ऑफस्पिनचा राजा" य लेखातला काही भाग.
निवृत्तीचे लेख - महान खेळाडूंच्या निवृत्ती समयी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख.
आणि ही सक्तीची निवृत्ती - मॅच फिक्सिंगच्या कृत्यामुळे महंमद अझरुद्दीनाला क्रिकेटमधून बाहेर काढलं. सुरुवातीचा अझर ("पाळणा हलताना" भागातील लेख) आणि तो कसा बदलत वाहवत गेला याबद्दल एक लेख आहे. तर दुसरा लेख बीसीसीआयचे सर्वेसर्वा समजले जाणारे दालमिया यांना अध्यक्षप्दावरून पायउतार व्हावं लागलं, ते क्रिकेटमागचं राजकारण टिपणारा लेख.
मत्युलेख - हे सुद्धा खेळाडूंच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे, आठवणी जागवणारे लेख आहेत. पण यात वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्ता असूनही फार चमकू न शकलेल्या खेळाडूंवर, आणि पूर्वी प्रसिद्ध पण सध्याच्या पिढीला फार माहितीचे नसलेल्या खेळाडूंवरही लेख आहेत. दोन तीन क्रीडा पत्रकारांवरसुद्धा लेख आहेत. उदा. बॉबी तल्यारखान क्रिकेट समालोचक, पत्रकार यांच्या आठवणी :
पुस्तकात लेखांच्या प्रकाशनाच दिनांक आणि नियतकलिकाचे नाव द्यायला हवे होते.
सगळे नियतकालिकांमधले लेख असल्यामुळे थोडेसेच तांत्रिक आहेत. बहुतेक लेख हे आठवणी, किस्से आणि एका क्रिकेट भक्ताने आपल्या "हिरों"वर केलेली शब्दफुलांची उधळण अशा स्वरूपातले आहेत. जर तुम्हाला क्रिकेट आवडत असेल तर हे लेख वाचायला आवडतील. नवीन किस्से कळतील. काही प्रसंगांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. विरंगुळा म्हणून वाचायला छानच आहे. क्रिकेट नसेल आवडत (माझ्यासारखं) तरी पुस्तक चाळा. "होम ग्राउंड", "माजी मास्टर्स" आणि "मृत्यूलेख" विभागातले काही लेख वाचायला आवडतील. एखाद्या क्षेत्रात महान व्यक्तिमत्त्व कसं तयार होतं हे वाचणंसुद्धा उद्बोधक आहे.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment