पद्मगंधा दिवाळी अंक २०२१ (Padmagandha Diwali Edition 2021)

 



पद्मगंधा दिवाळी अंक २०२१ (Padmagandha Diwali Edition 2021)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २७२

मी आधी वाचलेल्या दोन दिवाळी अंकांप्रमाणे (पुढारी, माझा) हा दिवाळी अंक सुद्धा वाचनीय आहे. देशोदेशीची संस्कृती आपल्यासमोर मांडणारे लेख ही ह्या अंकाची मध्यवर्ती संकल्पना आहे. चीन, जपान, आयर्लंड, इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया इ देशांत दीर्घकाळ राहिलेल्या आणि तिथल्या संस्कृतीची चव चाखलेल्या मराठी व्यक्तींनी आपले अनुभव सांगितले आहेत. प्रत्येक लेखकाने त्यांना भावलेले संस्कृतीचे अंग उलगडून दाखवले आहे. कोणी तिथल्या खाद्यपदार्थांबद्दल तर कोणी प्रथांबद्दल लिहिले आहे. काही लेखांत भाषेबद्दलच्या गमती आहेत तर कशात औद्योगिकतेबद्दल. त्यामुळे सगळे लेख वाचनीय आणि वैविध्यपूर्ण झाले आहेत.

अंकात काही गोष्टी आहेत. त्या गोष्टी मला आवडल्या. 

काही कला समीक्षात्मक लेख आहेत. जी.ए. कुलकर्णी, प्रभाकर कोलते, बाळ ठाकूर इ. कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे दीर्घ लेख सुद्धा आहेत.




लेखांची थोडी झलक

आयर्लंड बद्दलच्या लेखात गगणेश देवी ह्यांनी एक गमतीदार किस्सा सांगितला आहे. बडोदा शहर आणि आयर्लन्ड यांचा अनोखा संबंध आहे त्याबद्दलचा हा किस्सा 

मूळ अमेरिकन आदिवासी समाजातल्या लोकांच्या प्रथांबद्दल एका लेखातील मजकूर 



जपानी म्हणी; त्यांच्यात दिसणारे जपानच्या निसर्गाचे आणि जीवनपद्धतीचे प्रतिबिंब; काही मराठी म्हणींशी दिसणारे साधर्म्य सांगणारा, भाषाप्रेमींना आवडेल असा लेख 



चीन मध्ये राहताना तिथली प्रगती, नियोजन, चिनी भाषा आणि "ते लोक काहीही खातात"चा चक्षुर्वैसत्यम अनुभव 



देशोदेशींच्या संस्कृतींनी बहुरंगी बहुढंगी झालेला हा अंक वाचकांना नक्कीच आवडेल. 



———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...