पुस्तक - सहज सोपी मोडी लिपी (Sahaj Sopi Modi Lipi)
लेखक - श्रीकृष्ण लक्ष्मण टिळक (Shrikrushna Lakshman Tilak)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १००
ISBN - दिलेला नाही
मराठी भाषेची शीघ्र लिपी असणाऱ्या मोडी लिपीबद्दल उत्सुकता वाढत आहे. बरेच फेसबुक ग्रुप आणि युट्युब चॅनल उपलब्ध होत आहेत. काही चांगली पुस्तकं सुद्धा पूर्वीपासून उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वी मी ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकावरून मोडी मुळाक्षरे शिकलो. छापील मोडी वाचता येत होते. पण खरी मोडी पत्रे, दस्तऐवज वाचता येत नाहीत. कारण छापील मोडी सुवाच्च्य असते. पत्रे हस्तलिखित असतात त्यामुळे लिहिणाराच्या हस्ताक्षरावर ते अवलंबून राहते. काय लिहिले आहे ते बऱ्याच वेळा संदर्भावरून वाचावे लागते. त्यावेळची भाषा, वाक्प्रचार, संक्षिप्त रूपे इ. माहिती असेल तर ते शक्य होते. त्यादृष्टीने शोधाशोध केल्यावर काही पुस्तकांची माहिती कळली. त्या पुस्तकांबद्दल माहिती ह्या आणि येत्या काही परीक्षणांत देईन. आजचे पुस्तक आहे "सहज सोपी मोडी लिपी".
जुन्या कागदपत्रांत आढळणारा आणि नव्या वाचकाला कठीण वाटणारा भाग म्हणजे कालगणना. पात्रांमध्ये इस्लामी कालगणनेत त्या पत्राचा दिवस वार सांगितलेला असतो. काहीवेळा इस्लामी आणि हिंदू अश्या दोन्ही प्रकारे लिहिलेले असते. सध्या आपण जानेवारी-फेब्रुवारी हे महिने आणि इसवी सन वापरतो. त्यामुळे जुनी कालगणना समजून घेणं आवश्यक आहे. ह्या पुस्तकात ते छान समजावून सांगितलं आहे.
पूर्वी वजनांसाठी मन, शेर, रत्तल अशी मापं होती. लांबीसाठी/क्षेत्रफळासाठी मीट-फूट ऐवजी वार, काठी, गुंठे इ. वापरायचे. त्यांची यादी पुस्तकात आहे. पै, आणे , रुपये लिहिण्याची पद्धत वेगळी होती. ".||. , .|||." असं लिहिलं जायचं. ती पद्धत नीट समजावून सांगितली आहे.
उदा.
जुन्या विशिष्ट शब्दांची सूची आहे.
सरावासाठी पाच सहा पाने मोडी मजकूर आहे. पण त्याचे देवनागरी लिप्यांतर दिलेले नाही. ते हवे होते म्हणजे शिकणाऱ्याला आपले वाचन बरोबर आहे का ते ताडून बघता आले असते.
पुस्तक कुठे मिळेल ?
मी हे पुस्तक डोंबिवलीच्या "मॅजेस्टिक बुक गॅलरी"तून घेतले. ऑनलाइनसुद्धा (Amazon.com, Flipkart.com) वर उपलब्ध आहे.
छापील किंमत - रु. १२०/-
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment