जर्मन शिका(German Shika)




पुस्तक : जर्मन शिका
लेखक : अविनाश बिनिवाले

भारतात शिकल्या-शिकवल्या जाणाऱ्या परदेशी भाषांमध्ये जर्मन अतिशय लोकप्रिय आहे. महाविद्यालयात आणि खाजगी शिकवण्यांमार्फत अनेक जण जर्मन शिकतात. पण ज्यांना वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे शिकवणी वर्गाला जाणे जमत नाही अशांसाठी  हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

मराठी भाषकांना घरबसल्या जर्मन शिकवणरे हे पुस्तक आहे. जर्मन मधे संस्कृतप्रमाणेच व्याकरणाचे अनेक नियम आणि त्याला अनेक अपवाद असा प्रकार आहे. त्यामुळे व्याकरण टाळून जर्मन शिकणे कठिणच आहे. म्हणूनच या पुस्तकात जर्मनचे व्याकरण सुयोग्य पद्धतीने शिकवले आहे.

सर्वनामे, त्यांची रुपे, विभक्ती, क्रियापदे, काळांप्रमाणे क्रियापद चालवण्याचे नियम, अव्यये ई. सर्व आवश्यक गोष्टी छान समजावून सांगितल्या आहेत. या पुस्तकाच्या आधारे बेसिक व्याकरण शिकून पुढे स्वतः वाचन करून सरावाद्वारे जर्मन लिहिणे-वाचणे नक्कीच शक्य होईल.

प्रत्येक जर्मन वाक्य, त्याखाली त्याचा उच्चार, त्याखाली प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ आणि शेवटी मराठी भाषांतर असे दिले आहे. उदा.

Ich      hatte     dich      gestern     abend            gefragt
इश     हाटऽ     डिश्‌      गेस्टेर्न      आऽबन्ट        ग’फ्राक्ट्‌
मी      होतो      तुला      काल        संध्याकाळी    विचारलेलो
मी काल संध्याकाळी तुला विचारलेले होते

त्यामुळे उच्चार, जर्मन मधला शब्दक्रम आणि मराठीशी असलेले साम्य/फरक लवकर लक्षात येतो.

थेट मराठीतून शिकवले असल्याने जे मराठी माध्यमातून शिकले आहेत किंवा ज्यांचं मराठी व्याकरण बरं आहे अशांना या पुस्तकाद्वारे जर्मन शिकणं सोयिस्कर आहे. जर्मन-ते-इंग्लिश आणि इंग्लिश-ते-मराठी असा बौद्धिक प्रवास करावा लागत नाही.

जर्मन शिकू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक अवश्य अभ्यासावे आणि संग्रही ठेवावे.


This book helps you learn German through Marathi. With the help of this book you can learn German from Marathi on your own. Book thoroughly discusses all grammar concepts like pronouns, their forms, verbs, forms as per tenses, conjunctions etc.
Those interested in learning German should study this book and keep it as a reference.




1 comment:

  1. Unfortunately this book is not available in market since last 2 years. Eagerly waiting to buy this , where i can getvit.

    ReplyDelete

खुलूस (Khuloos)

पुस्तक - खुलूस (Khuloos) लेखक - समीर गायकवाड (Sameer Gaikwad) भाषा - मराठी (Marathi) पाने - १९६ प्रकाशन - रोहन प्रकाशन, प्रथम आवृत्ती जाने ...