योगिक प्राणायाम (Yogik Pranayam)




पुस्तक (Title): योगिक प्राणायाम (Yogik Pranayam) 
मूळ इंग्रजी पुस्तक (Original English Book) : Yogic Pranayama
भाषा (Language) : मराठी  (Marathi)
लेखक (Author) : डॉ. के. एस. जोशी (Dr. K.S. Joshi)

अनुवादक (Translator) : डॉ. अरूण मांडे (Dr. Arun Mande) 



योग, योगासने, सूर्यनमस्कार, प्राणायाम हे शब्द आता कुणाला अनोळखी राहिले नाहीत. पुस्तकं वाचून, टीव्हीवर बघून, ऑनलाईन व्हिडिओ बघून किंवा प्रत्यक्ष शिकवणीला जाऊन या गोष्टी शिकण्याचा किंवा किमान त्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न अनेक जण करताना दिसतात. अशा सर्वांसाठीच उपयुक्त असे हे पुस्तक आहे. या दीडशे पानी पुस्तकातल्या प्रकरणांबद्दल सांगितलं की तुम्हाला पुस्तकाची चांगली कल्पना येईल. 

प्रकरण १: प्राणयाम म्हणजे काय ? 
यात शाव, श्वसन त्याच्यावरचे नियंत्रण या बद्दलची प्राथ्मिक माहिती आहे

प्रकरण २: प्राणायामाविषयी गैरसमज
यात वेगवेगळ्या गैरसमजांबद्दल ऊहापोह केला आहे आणि त्यात कसं तथ्य नाही हे समजवलं आहे उदा. प्राणायाम धोकादायक आहे,गुरुमन्त्र घेतल्याशिवाय प्राणायाम करू नये,प्राणायामाने श्वास वाचल्याने कितीही काळ जगता येतं इ.

प्रकरण ३: सुरुवात करण्यापूर्वी
यात प्राणायामाविषयीच्या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची चर्चा आहे.
उदा. प्राणायाम कोणी करावा/करू नये, कधी करावा, किती वेळ करावा, जागा कशी असावी, खाण्यापिण्यात काही बदल केले पाहिजेत का इ.
प्राणायाम करताना बसण्याची स्थिती कशी असावी उदा. सिद्धासन, पद्मासन, सुखासन हे समजवलं आहे

प्रकरण ४: प्राणायाम कसा करावा
प्राणयामाच्या तीन अवस्था - पूरक, कुंबहक, रेचक - या बद्दल विस्तृत माहिती आहे. या अवस्था कशा मोजायच्या, त्यांचं प्रमाण किती असलं पाहिजे याचही नीत विवेचन आहे. सुरुवातीला तो किती करावा मग वेळ हळूहळू कसा वाढवावा हे विस्तृतपणे लिहिले आहे.
प्राणयाम करताना काही खास बंध (शरीराची विशिष्ट स्थिती )- जिव्हाबंध, जालंदरबंध, उड्डियानबंध, मूलबंध - सांगितले आहेत. त्याचीही तप्शीलवार आणि सचित्र समजावले आहेत.

प्रकरण ५: प्राणायामाचे प्रकार
अनुलोम-विलोम, सूर्यभेदन, उज्जयी,भस्त्रिका, शितली, सितकरी, भ्रमरी, मूर्च्छा, प्लविनी ई. बद्दल थोडी थोडी माहिती आहे.

प्रकरण ६: प्राणायाम आरोग्याची गुरुकिल्ली
श्वसन कसं होतं, फुफ्फुसात रक्त शुद्ध कसं होतं, प्राणायामामुळे त्याच्यावर चांगलां परिणाम कसा होतो, मेंदूवर नियंत्रण कसं मिळतं इ.

प्रकरण ७: प्राणायामाद्वारे रोगांवर उपचार 
यात सर्वप्रथम अनारोग्याच्या कारणांची चर्चा आहे. आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी आहर-विहार-विश्रांती कशी सुधारली पाहिजे याबद्दल सामान्य ज्ञान आहे. त्यानंतर काही विशिष्ट समस्यांवर प्राणयाम - कुठला, कसा, किती - करावा तसंच कुठली योगासने करावीत याबद्दल मार्गदर्शन आहे. उदा. डोकेदुखी, मायगेन, मधुमेह, व्हेरिकोव व्हेन, लंगिक कमजोरी इ.

परिशिष्ट १ : सूर्यनमस्कार 
सूर्यनमस्काराच्या स्थितींची चित्रे आणि थोडं वर्णन आहे.

परिशिष्ट २ : काही महत्त्वाची आसने
८ आसनांची चित्रे आणि थोडं वर्णन आहे.

परिशिष्ट ३ : ’योगाद्वारे’ तंदुरुस्त रहा
१६ आसने आणि प्राणायाम यांचा रोज ६० मिनिटे सराव करण्यासाठी क्रम आणि वेळ दिला आहे.


वाचताना दोन गोष्टी जाणवतात; एक - पुस्तका लेखकाबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. लेखकाचा या क्षेत्रातला अनुभव, काम याची माहिती मिळाली असती तर पुस्तकाचा प्रभाव वाढण्यात आणखी मदत झाली असती.
दुसरं - लेखकाने महर्षी पतंजलींचं योगसूत्र, "घेरंड संहिता", हठयोग, योगवाशिष्ठ या ग्रंथांचा संदर्भ दिला आहे. पण प्राणयामाबद्दलच्या कुठल्याही आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचा संदर्भ येत नाही. 

प्रकरणांविषयी हे वाचल्यावर पुस्तक माहितीपूर्ण आहे हे सांगायलाच नको. तसंच प्राणायामाची सुरुवात कशी करावी हे वाचून प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात करता येईल. एकदा या वाटेवर प्रवास सुरु झाला की प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि अधिक वाचन, सराव, अभ्यास हे पुढचे टप्पे आहेतच. 
या प्रवासाचा श्रीगणेशा तुम्ही केला नसेल तर प्राणायाम आणि त्याचे फायदे याची तोंडओळख होऊन प्राणायाम करावा असं नक्कीच वाटायला लावणारं हे पुस्तक आहे.


------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti)

पुस्तक - माणसांच्या गोष्टी (Manasanchya Goshti) लेखिका - छाया महाजन (Chhaya Mahajan) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४३ प्रकाशन - रोहन प्रका...