लेखिका - Madhuri Lele (माधुरी लेले)
भाषा - English (इंग्रजी )
पाने - १३६
ISBN - 978-81-950875-6-3
माझी आत्या माधुरी लेले हिने लिहिलेलं हे पुस्तक आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या ८२ पानांमध्ये एक दीर्घकथा आहे. एका उद्योग घराण्यातली व्यक्तीला कोरोनाची लक्षणं दिसल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागतं. आणि त्या साताठ दिवसात हॉस्पिटलमध्ये कोरोनाची गंभीर परिस्थिती बघून त्याचं मन संवेदनशील होतं. असं कथाबीज आहे. त्यातली ही एकदोन पानं.
उरलेल्या पानांमध्ये वेगवेगळ्या लोकांचे कोरोनाबद्दलचे लेख आहेत. छोट्यामोठ्या कंपन्यांचे सीईओ, डॉकटर, समाजसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, शालेय विद्यार्थी यांचे १-२ पानी लेख आहेत.
उदा.
गोष्ट ठीक आहे पण ती खूप उत्कंठावर्धक अशी नाही. विवेक या पात्रात झालेला बदल खूपच पटकन झालेला वाटतो. ते अजून रंगवता आलं असतं तर त्याचा परिणाम जाणवला असता. आणि हॉस्पिटल मधून त्याने पुढे मोठं काम करायचं ठरवलं आणि माहिती गोळा केली वगैरे कळतं पण पुढे त्याचे नक्की काय झालं काही समजत नाही त्यामुळे गोष्ट अर्धवट सोडल्यासारखी वाटते.
दुसऱ्या भागात वेगवेळ्या लोकांचे लेख आहेत. पण बहुतांश लेखांमध्ये तेच तेच मुद्दे आले आहेत उदा. लॉकडाऊन कसं झालं, कामाची पद्धत कशी बदली, स्वच्छतेची पद्धत कशी बदलली, ऑनलाईन शिक्षण इत्यादी इत्यादी. पुस्तकाचे वाचक सुद्धा सध्या या गोष्टी स्वतः अनुभवत आहेत. आजूबाजूला बघत आहेत. त्यामुळे पुन्हा त्या लोकांच्या तोंडून हे वाचण्याचं प्रयोजन कळत नाही.
त्याऐवजी एकच लेख केला असता आणि त्यात मध्ये मध्ये लोकांची वक्तव्ये घातली असती तर एक मुद्देसूद लेख तयार झाला असता आणि 2020 ची परिस्थिती काय होती याचा सारांश मांडला असं तरी वाटलं असतं. आता पुढे काय करता येईल याचे मुद्दे घालता आले असते, काही नव्या कल्पना मांडता आल्या असत्या तर काही वेगळेपणा आला असता.
पुस्तकाचं नाव आणि उपशीर्षक यातून वाढलेल्या अपेक्षांची पूर्तता हे पुस्तक करत नाही
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment