पुस्तक : खेळिया - कथा नरेंद्र मोदी नामक झंझावाताची (Kheliya - Katha Narendra Modi Namak Jhanjhavatachi)
लेखक - सुदेश वर्मा
अनुवादक - सुधीर जोगळेकर
भाषा - मराठी
पाने - ४२०
मूळ पुस्तक - Narendra Modi : The game changer
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी
ISBN - 978-93-80549-93-4
प्रकाशक - मैत्रेय प्रकाशन
भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ह्या व्यक्तिमत्त्वाने गेल्या काही वर्षांपासून भारतीय समाजाला आकर्षित केलं आहे. सामाजिक जीवनात वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. प्रेम आणि द्वेष; विश्वास आणि भीती अश्या टोकाच्या भावना त्यांच्याबद्दल समाजात आहेत. भावना कुठल्याही असोत त्या जितक्या सत्यावर आधारित किमान पक्षी उपलब्ध माहितीच्या आधारावर असतील तितक्या चांगल्या. त्यामुळे मोदीयुगात वावरताना आपल्याला मोदींबद्दल अधिक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. त्यादृष्टीने हे पुस्तक वाचनीय आहे.
हे पुस्तक(पहिली आवृत्ती) २०१३ साली प्रकाशित झाली आहे. त्यावेळी भाजप ने पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून मोदींचं नाव पुढे आणलं होतं. गुजरात मॉडेल राबवणारे मोदी, विकासाचं राजकारण करणारे मोदी, २००२ गुजरात दंगलींबद्दल टीका झेलणारे मोदी असा मतामतांचा गलबला झालेला असताना माहिती, सत्य, तथ्य लोकांसमोर आणावं ह्या उद्देशाने लेखकाने हे पुस्तक लिहिलं आहे.
त्या मनोगतातला हा भाग
२०१४ मध्ये प्रकाशित झालेल्या पुढच्या आवृत्तीत निवडणुकांमधल्या अभूतपूर्व विजयाबद्दलचं एक प्रकरण जोडण्यात आलं. मोदींच्या जन्मापासून २०१४ पर्यंतच्या जीवनातले महत्त्वाचे टप्पे यात सविस्तर सांगितले आहेत.
अनुक्रमणिका
नरेंद्र मोदींचा मूळचा पिंड सर्वसंगपरित्याग करून संन्यासी होण्याकडे कल असलेला. पण तरुण वयात संपर्कात आलेल्या अधिकारी व्यक्तींकडून त्यांना आपले जीवन समाजाभिमुख करण्याचा सल्ला मिळाला. त्याबद्दलचा पुस्तकातला एक प्रसंग
आधी संघ स्वयंसेवक, संघ अधिकारी मग भाजप मध्ये कार्यकर्ता असा मोदींचा प्रवास सुरु झाला. आणीबाणीच्या काळात त्याविरुद्धच्या चळवळीत झोकून देऊन काम करणारा कार्यकर्ता दाखवणारा एक प्रसंग
स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाने, समर्पणाने गुजराथ राज्यातल्या भाजप संघटनेत त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. निवडणुका जिंकण्यामध्ये त्यांच्या व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. तरीही केशूभाई पटेल आणि शंकरसिंग वाघेला या बड्या प्रस्थांच्या गटबाजीत मोदींचा बळी गेला. दोन्ही बाजूंना ते आपले विरोधी आणि प्रतिस्पर्धी वाटत होते. आणि आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी घटना घडली होती. मोदींची गुजराथ भाजप मधून दूर करण्यात आलं. त्यावेळच्या मोदींच्या भावना दाखवणारा हा प्रसंग
मोदींना थेट उत्तरेत हरियाणा, हिमाचल, पंजाब इ. राज्यांत जबाबदारी देण्यात आली. तिथे सुद्धा त्यांनी चमकदार कामगिरी केली. पुढे गुजराथेतली राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी पक्षाला मोदींनाच पाचारण करावं लागलं. हा घटनाक्रम पुस्तकात सविस्तर आला आहे.
मुख्यमंत्री झाल्यावर "गुजरात मॉडेल" आकार घेऊ लागलं. शेती, उद्योग, कौशल्य विकास, पर्यटन, ऊर्जा पुरवठा, दळणवळण प्रत्येक क्षेत्रात गुजराथ मध्ये नवनव्या योजना त्यांनी सुरू केल्या. नोकरशाहीला कामाला लावलं. तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल सेवा, ऑनलाईन माहिती, एक खिडकी योजनांतून सामान्यांपासून उद्योजकांपर्यंत सर्वांचं "सरकारी काम" सोपं केलं. "गुजरात विकास प्रारूपा"च्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्र प्रकरण आहे. योजना, त्यांचं स्वरूप, दिसलेले परिणाम हे सगळं सविस्तर समजावून दिलं आहे.
नोकरशाहीची मानसिकता बदलली. प्रामाणिक अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या दिल्या. निर्णयाचं स्वातंत्र्य दिलं. त्याबद्दलच्या प्रकरणातला हा भाग
जुनाट पद्धतीने विचार करून शेती व्यवसायाची जुनाट दुखणी दूर होणार होणार नाहीत हे ओळखून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी कल्पक कामाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्याची एक झलक
ह्या सगळ्या विकासकामांमधून गुजराथ मधल्या मुस्लिम समाजाचा सुद्धा विकास झाला. पुन्हा पुन्हा मोदी निवडणुका जिंकत राहिले. मुस्लिम बहुल भागातून सुद्धा भाजप जिंकू लागला. तरीही मोदी म्हणजे मुस्लिम विरोधी हे टुमणं चालूच. पण ज्यांनी खरंच मोदींचं काम बघितलं, प्रत्यक्ष संपर्क साधला त्या मुस्लिम व्यक्तींचं सुद्धा मतपरिवर्तन झाल्याचे कितीतरी किस्से या पुस्तकात दिले आहेत. त्यातली ही दोन पानं
"बोलणाऱ्याची माती खपते पण न बोलणाऱ्याचे सोनेही खपत नाही" हा आपला अनुभव. मोदी मात्र सोनेरी काम करण्यात हुशार तितकेच बोलण्यात आणि कामाची जाहिरात करण्यात सुद्धा हुशार. त्या पैलूवर - मोदींचं गुजराथेतल्या आणि २०१४ च्या निवडणूक प्रचाराचं प्लॅनिंग , लोकांची नस ओळखून मुद्द्यांची निवड, प्रचाराची पद्धत - याबद्दल सुद्धा प्रकरणं आहेत.
पुस्तक बारीक टायपातलं भलं मोठं आहे. पण माहितीने भरलेलं आहे. सुधीर जोगळेकरांनी केलेलं भाषांतर सुद्धा सोपं, सहज आहे.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment