पुस्तक : मोडी लिपी शिका सरावातून (Modi Lipi shika saravatun) - Modi Script Learn & Practice
लेखक : नवीनकुमार माळी (Navinkumar Mali)
भाषा : मराठी आणि इंग्रजी (Marathi & English)
पाने : १७५ ( मोठ्या ए-फोर किंवा लॉंग बुक आकारातील)
ISBN :978-1-63535-518-5
इंग्रजी लिहिताना आपण रोमन लिपी वापरतो आणि मराठी लिहिताना देवनागरी लिपी. तसेच इंग्रजी लिखाण वेगाने व्हावे म्हणून कर्सिव लिपी/रनिंग लिपी आहे. त्याचप्रमाणे मराठी लेखन वेगात व्हावे यासाठी "मोडी" लिपी पूर्वी वापरली जात असे. १२व्या शतकापासून शिवकाल, पेशवेकाल, ब्रिटिशकाल यांमध्ये मोडीलिपी मोठ्याप्रमाणवर वापरली जात असे. जिथे राजभाषा मराठी होती तिथे राजकीय पत्रसंवाद, व्यावसायिक व्यवहारांच्या नोंदी, जमिनीची इनामे, खरेदीविक्री यांच्या नोंदींसाठी मोडीलिपीचा वापर होत असे. माझ्या वडिलांनी सांगितलं की ४०-५० वर्षांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांकडे घरगुती पत्रं पण मोडी लिपीत लिहिलेली त्यांनी बघितली आहेत.
पण आता ही लिपी वापरात नसल्याने ही लिपी वाचू शकणारे लोक खूप कमी राहिले आहेत. जुने-जाणते लोक, इतिहाससंशोधक किंवा जुन्या लिपी-भाषांचे अभ्यासक यांपुरतीच ती मर्यादित राहिली आहे. शिवकाल-पेशवेकाल या मराठी माणसाला अभिमानस्पद असणाऱ्या कालखंडाचा इतिहास या मोडीलिपीत कुलुपबंद होऊन पडला आहे. सर्वसामान्य वाचक थेट जुनी कागदपत्रे वाचू शकत नाही.
पण आता मनु बदलतो आहे. मोडीलिपीचं महत्त्व जाणून तिच्याकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मोडी जाणणारेही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. तरूण आणि मध्यमवयीन पिढी नवीन तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापरातून या प्रसार-प्रचाराला गती देत आहेत. नवीनकुमार माळी हे असेच मोडीप्रेमी युवक आपल्यासाठी घेऊन आले आहेत पुस्तक "मोडी लिपी शिका सरावातून".
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती:
या पुस्तकात मोडीची मुळाक्षरे, बाराखडी, जोडाक्षरे दिलेली आहेत. मोडी शिकवणाऱ्या पुस्तकांतून तुम्हाला हा मजकूर आढळेल पण या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की यात सरावासाठी सगळ्या अक्षरांचा कित्ता आहे. उदा.
शाळेत "व्यवसाय" किंवा वर्कबुक भरायचो त्या आकारातलं पुस्तक आहे. कित्ता गिरवून गिरवून तुम्ही अक्षर घोटू शकता. अक्षराचा आकार लक्षात येण्यासाठी हे चांगलं आहे. मी शाळेत असताना हस्ताक्षर सुधारण्यासाठी "सुलेखन" असा कित्ता होता. मोडीच्या या कित्त्यामुळे तुमचं मोडी लेखन सुरुवातीपासूनच सुवाच्य होईल.
पुस्तक द्विभाषिक आहे. जी माहिती मराठीत आहे तिचं इंग्रजी भाषांतरही आहे. ज्याला मराठी येत नाही अशी व्यक्तीही थेट इंग्रजीतून मोडी शिकू शकेल. पण मोडी लिपी शिकून शेवटी वाचायचा मजकूर मराठीतलाच. तेच जर समजत नसेल तर अक्षरओळख होऊनही गाडं अडणारच. त्यामुळे या इंग्रजी भाषांतराचा फार उपयोग होईल असं वाटत नाही.
पुस्तकात मोडीलिपीच्या इतर पैलूंचाही विचार आहे. अनुक्रमणिका बघितली की लक्षात येईल.
सरावासाठी मोडी छापिल परिच्छेद आहेत. एकदोन जुनी पत्रं ही आहेत. मोडी लेखन नीट जमू लागलं की हे छापिल उतारे तुम्ही सहज वाचू शकाल. जुनी पत्र वाचताना मात्र धाड्कन तोंडावर पडल्यासारखं होतं. काहीच बोध होत नाही. एकदोन ओळखीची काही अक्षरं दिसतात आणि बाकी मात्र अगम्य गिचमिड वाटते. पण इतपत मोडी आलं तरी तुम्ही पहिली पायरी व्यवस्थित पार केली असं म्हणायला हरकत नाही. यातच या पुस्तकाचा उद्देश पूर्ण झाला असं मी म्हणेन. छापिल, सुवाच्य मोडी वाचता येत्ये पण जुनी पत्रं वाचता येत नाहियेत ही रुखरुख तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही आणि प्रगत अभ्यासाचा शोध तुम्ही घेऊ लागाल हे नक्की.
नवशिक्यांसाठी पुस्तक उपयुक्त आहेच. पण पुस्तकाची पुढची आवृत्ती निघेलच तेव्हा विचार करण्यासाठी काही सुचवावेसे वाटते आहे :
1) एकाच अक्षरांचे विविध प्रकार दिले आहेत तसेच एकसारखी दिसणारी पण वेगवेगळी अक्षरे एकत्र द्यायला हवीत म्हणजे एका नजरेत ती दिसली की त्यांच्यातला सूक्ष्म फरक चट्कन जाणवतो.
2) "र चा वापर" या प्रकरणात थोडा "विषयप्रवेश" म्हणजे ’र’चे प्रकार काय आहेत; कसे वापरले जातात ही थोडी "थेअरी" समजवून सांगितली की पुढचे "प्रॅक्टिकल" अजून सोपं वाटेल.
3) सरावासाठी जे उतारे आणि पत्रं दिली आहेत त्यांचं देवनागरी लिप्यंतरण द्यायला हवं होतं.
4) मोडी सरावासाठी स्वतःच्या किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवातून समजलेल्या काही "टिप्स अॅंड ट्रिक्स" दिल्या असत्या तर अजून मजा आली असती.
5) हे पुस्तक यशस्वीरित्या पूर्ण केलं की पुढची पायरी काय; याच्याकडे अंगुलीनिर्देश हवा. फेसबुक ग्रूप, यूट्यूब व्हिडिओ, शिकवण्या ज्यात लेखक स्वतःही सक्रिय आहेत त्यांची माहिती देणंही अगत्याचं होईल.
मी काही वर्षांपूर्वी ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकावरून मोडी शिकलो होतो. छपिल मोडी वाचता येऊ लागली पण पुढच्या प्रगत शिक्षणाचा योग अजून जुळून आला नाही. ट्विटर वर मी नवीनकुमारांचे मोडी विषयक ट्वीट्स बघितलेले. त्यांनीही माझा ऑनलाईन मराठी भाषा शिकवणारा उपक्रम व आधीची पुस्तक परीक्षणे वाचली होती. त्यातून आमचं फोनवर बोलणंही झालं. नवीनकुमारांनी पुस्तक मला पाठवून मला पुन्हा त्यांच्या पुस्तकाबद्दल अभिप्राय द्यायला सांगितल्यामुळे मोडीच्या माझ्या आठवणी ताज्या झाल्या. या पुस्तकाचे परीक्षण लिहून, इतरांना याबद्दल सांगून मोडीप्रचारात माझाही खारीचा वाटा देण्याची संधी मला त्यांनी दिली याचा मला आनंद आहे.

पुस्तक अमेझॉनवरसुद्धा उपलब्ध आहे.
https://www.amazon.in/MODI-SCRIPT-Learn-Practice-Navinkumar/dp/1635355184/
ही लिंक बघा. नाही चालली तर थेट नाव शोधा.
मोडीवरचं पुस्तक वाचताना मलाही पुन्हा मोडी लिहावसं वाटू लागलं. म्हणून या परिक्षणाचे पहिले दोन परिच्छेद मोडीत लिहिले आहेत. एकूणच हातने लिहिण्याची सवय गेल्याने सध्या अक्षर तितकं चांगलं राहिलं नाही, त्यात हे मोडी. त्यामुळे पुढचे उतारे दुर्बोध वाटले तर सगळा दोष माझ्याकडेच बरं

------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा ) आशि (आवर्जून शिका)
------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------