Wednesday, 30 December 2015

आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन(Amen-the autobiography of a nun)आमेन-द ऑटोबायोग्राफी ऑफ अ नन (Amen-the autobiography of a nun)
लेखिका - सिस्टर जेस्मी
अनुवाद - सुनंदा अमरापुरकर

सिस्टर जेस्मी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद खूप छान झाल आहे. मूळ पुस्तकच मराठीत आहे असं वाटतं. कुठेही बोजडपणा आलेला नाही.

एका केरळी भारतीय "नन"ने- तेहेतीस वर्षं कॉन्व्हेंट मध्ये घालवली अनेक अन्याय, अत्याचार सोसत. आणि या अत्याचारांचा अतिरेक झाल्यावर शेवटी कॉन्व्हेंट सोडायचा निर्णय घेतला. आणि त्या तथाकथित सेवाभावी, पवित्र गणल्या गेलेल्या संस्थांमधील गैरप्रकार, अनैतिक लैंगिक संबंध, भ्रष्टाचार, राजकारण, उच्चनीचता, अंधश्रद्धा यांबद्दल लिहिती झाली.

नन होण्याची क्लिष्ट प्रक्रिया क्लिष्ट आहे, कठीण आहे. त्यासाठी वरिष्टांची अज्ञा पाळण्याची शपथ, आणि दारिद्र्याची शपथ घ्यावी लागते. ब्रह्मचर्य पाळणं अपेक्षित असतं. पण सर्वच नन्स ना ब्रह्मचर्य सांभाळणं जमत नाही त्यामुळे वाढीला समलैंगिक संबध लागलेले आहेत. लेखिकेलाही इतर शिकाऊ नन्स प्रमाणे एखाद्या वरिष्ठ "सिस्टर"(?) च्या अशा भुकेलाही बळी पडावं लागलं. काही "फादर"(?) कडून अत्याचार झाले. आणि येशूची इच्छा, येशू मार्ग दाखवेल अशा अंधविश्वासापोटी तीला सगळं सोसावं लागलं.

लेखिका हेही सांगते की चर्च मध्येही ननच्या सामाजिक आणि सांपत्तिक स्थितीनुसार नन्सम्ध्ये भेदभाव केला जातो. खालच्या दर्जाच्या नन्सना (ज्यांना चेडुथी म्हणतात) फक्त राबवलं जातं शारिरिक श्रमांसाठी.  पुरुष सभासद (फदर, ब्रदर) यांच्या तुलनेत महिलांना खूपच कष्टची कामं करावी लागतात. त्यांना आर्थिक स्वातंत्र्यही कमी मिळतं

सेवेच्या नावाखाली चालवलेल्या जाणाऱ्या कॉलेजमध्ये कसा भ्रष्टाचार होतो, डोनेशन कसं उकळलं जातं आणि त्याला विरोध करणाऱ्या सज्जन लेखिकेला शारिरिक मानसिक छळाला तोंड द्यावं लागलं, अपप्रचाराला तोंड द्यावं लागलं, इतकंच काय तीला वेडं ठरवण्याचा प्रयत्न "मदर"(?), "फादर(?)" यांनी केला.

विशेष म्हणजे लेखिकेकेने ज्या मुद्द्यांना हात घातला आहे त्या समस्यांचं निराकरण करण्याऐवजी चर्चमात्र लेखिकेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून तिला खोटं पाडण्याच्या उद्योगातच आहे.

चर्च, कॉन्व्हेंट आणि इतर धार्मिक संस्थांवर आंधळेपणाने विश्वास टाकणाऱ्या, धर्मांतरित होणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं हे पुस्तक आहे. तसंच हिंदूधर्म आणि इतर भारतीय धर्मांतच ज्यांना फक्त वाईट दिसतं त्यांना विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)
----------------------------------------------------------------------------------

Sunday, 22 November 2015

पश्चिम(Paschim)
पुस्तक : पश्चिम
लेखिका : विजया राजाध्यक्ष

विजया राजाध्यक्ष यांचा हा कथासंग्रह आहे. या सर्व कथांना सुखवस्तू पंढरपेशा समाजाही पार्श्वभूमी आहे. ह्या  शहरी समाजात घडणाऱ्या कौटुंबिक घटनांभोवती या कथा गुंफलेल्या आहेत.  त्यामुळे कथांमध्ये, विषयांमध्ये किंवा घडणाऱ्या घटनांमध्ये अनपेक्षित किंवा अतार्किक काही नाही. आजूबाजूला जे दिसतं, ऐकू येतं तेच आहे. 

मुलाचं परदेशी सेटल होणं स्वीकारलेल्या पण नातवावर इथले संस्कार व्हावेत अशी तळमळ असणारे आजोबा; महिलांचा मासिक धर्म आणि मुलीच्या ऋतुप्राप्तीबाबत बदललेला दृष्टिकोन; उच्चशिक्षित असूनही गृहिणी होऊन संस्कारात गुरफटत स्वतःचा शोध घ्यायचा राहिला याची रुखरुख; दुसऱ्या स्त्रीच्या यशामुळे हेवा वाटून निर्माण होणारा दुरावा आणि आयुष्याच्या अखेरीला त्यात जावणारी निरर्थकता ई.

सगळ्या कथा त्यातील मुख्य पात्रांचं आयुष्य व्यापणाऱ्या क्वचित त्यांच्या पुढच्या पिढीतल्यांचे संदर्भ असणाऱ्या आहेत. वर्षं सरतात, आयुष्य पुढे जातं आणि एखाद्या व्यक्तिकडे, घटनेकडे, मताकडे बघायचे आपले विचार कसे बदलत जातात हे मंडणाऱ्या साध्या सरळ कथा.

कुठलीही कथा किंवा पात्र फार लक्षात राहतं असं नाही पण तरीही कथा मनोरंजक आहेत. सहज वाचायला हरकत नाही.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक)

----------------------------------------------------------------------------------

Thursday, 19 November 2015

Rich Dad Poor Dad(रिच डॅड पुअर डॅड)
पुस्तक : Rich Dad Poor Dad (रिच डॅड पुअर डॅड)
लेखक : Robert T. Kiyosaki (रॉबेर्ट टी. कियोसाकी)

श्रीमंतीचं रहस्य सांगणरे पुस्तक.

आपण श्रीमंत असावं, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, बंगला, गाडी असावी, भरपूर फिरायला मिळावं असं स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. पण हे स्वप्न साकार कसं करावं हे आआपल्याला कळत नाही. काहीतरी घबाड हाती लागेल आणि श्रीमंत होता येईल अशा आशेवर अनेकजण जगतात. तर आजूबाजूची परिस्थिती बघता गैरमार्गानेच श्रीमंत होता येतं असाही समज करून घेऊन अनेक जण निराश होतात.

या कल्पनांना छेद देत पैसा, पैशाचं व्यवस्थापन आय(income)-व्यय(expenses) याबद्दल नव्याने विचार देणारं, विचार करायला लावणारं आणि कृती करायला लावणरं हे पुस्तक आहे.

पुअर डॅड म्हणजे लेखकाचे वडील हे अमेरिकन समाजातील एक मध्यमवर्गीय गृहस्थ. हुशार व  प्राध्यापकीच्या क्षेत्रात यशस्वी. पण पैशाच्या बाबतीत मध्यमवर्गीय धारणा असणारे. जास्त शिका, जास्त कष्ट करून अधिक पगाराची नोकरी करा, पैसे वाचवा, खर्च कमी ठेवा ई. अगदी मध्यमवर्गीय मराठी माणसासारखं म्हणणारे. पण तरीही आयुष्याच्या अखेरीपर्यंत श्रीमंत होऊ न शकलेले.

या उलट रिच डॅड म्हणजे लेखकाच्या मित्राचे वडील. ते कमी शिकलेले पण वेगवेगळे व्यवसाय करणारे. पैशाबद्दल त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत. अगदी कायदेशीर आणि नैतिकच आहेत. त्या संकल्पना त्यांनी लेखकाला शिकवल्या. आणि ते "डॅड" तर श्रीमंत होतेच पण त्यांच्या मर्गदर्शनाखाली लेखकही श्रीमंत झाला.

म्हणूनच "रिच डॅड" कशा पद्धतीने पैशाकडे बघतात; "मी पैशासाठी काम करत नाही तर पैशाला मी माझ्यासाठी काम करायला लावतो" असं कसं म्हणू शकतात, संपत्ती(assets)-दायित्त्व(liability) कशाला म्हणतात हे मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

लेखकाचं असं म्हणणं आहे की मध्यमवर्गीय माणसं कष्ट भरपूर करतात आणि श्रीमंतही; पण मध्यमवर्गीय "हार्डवर्क" करतात तर श्रीमंत होणारी व्यक्ती "स्मार्टवर्क" करते. पैशाकडे बघण्याच्या दृष्टिकोनाच्या फरकामुळे, अर्थसाक्षरतेच्या (Financial literacy)अभावामुळे मध्यमवर्गीयांच्या कष्टाचं चीज होत नाही. अधिक काम म्हणजे अधिक पैसा म्हणजे अधिक श्रीमंती असं हा समज चुकीचा आहे. एखाद्याचा पगार किंवा त्याचं उत्पन्न (वकील, डॉक्टर यांचं) भरपूर आहे म्हणून ते श्रीमंत नव्हेत. कारण त्यांनी काम करणं थांबवलं तर येणारं उत्पन्नही बंद होईल. श्रीमंत व्यक्ती मात्र अशा मालमत्ता(assets) जमवतात की काम न करताही त्यांना उत्पन्न मिळत राहतं. आणि मराठीत म्हणतात त्याप्रमाणे ते "बसून खाऊ" शकतात.

लेखकाने दिलेले सल्ले आणि टिप्स यांची उदाहरणं इथे देऊन मी आपली उत्सुकता मारत नाही आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एका ओळीच्या टिप्स वाचून गैरसमज होण्याची शक्यता अधिक. पूर्ण विवेचन वाचून समजून घेतल्यावरच त्याचा सारांश लक्षात ठेवणं योग्य होईल.

तर हे पुस्तक अवश्य वाचा. तरूणांनी, मध्यमवयीन व्यक्तींनी तर शक्य तितक्या लवकर हे पुस्तक वाचून अंलबजावणी केली पाहिजे.

मी हे इंग्रजी पुस्तक वाचलं असलं तरी याचा मराठी आणि इतर काही भारतीय भाषांमध्ये अनुवाद उपलब्ध आहे.

------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
------------------------------------------------------------

Wednesday, 18 November 2015

पेशवेकालीन पुणे(Peshawekalin Pune)

पुस्तक : पेशवेकालीन पुणे
लेखक : रावबहादूर डी.बी. पारसनीस

पुस्तक परीक्षण ज्योती काळे यांचे द्वारा

रावबहादूर डी.बी. पारसनिसांनी ८५-८६ वर्षांपूर्वी इंगजी आमदानीतल्या गोऱ्यांना पेशवेकालीन पुण्याचे ऐश्वर्य समजावे,वास्तूशिल्प शैलीची ओळख व्हावी म्हणून लिहिलेल्या "पुणे पूना इन बायगॉन डेज" लिहिलेत्या पुस्तकाचे आशयघन मराठी रूपांतर डॉ.सुरेश र. देशपांडे ह्यांनी केले आहे. प्रथम आवृत्ती २००७ साली निघाली.

ह्या  प्रकरणात पुणे-शनिवारवाडा-पर्वती-वकिलात निवासस्थान-शिंद्यांची छत्री-पोलिसखाते-सण समारंभ सगळे सामावलय. 

पेशव्यांच्या निवासस्थनामुळे पुण्याचा विस्तार झपाट्याने झाला. शनिवारवाडा अत्यंत भव्य राजेशाही प्रासाद होता. वाड्याच्या मुख्य इमारतीतून आळंदीच्या मंदिराचा कळस व पर्वतीचा सुरेख देखावा दिसे. पर्वतीवर सुरेख मंदिरं बांधली होती. दक्षिणा देण्याचा हेतू शिक्षण देण्याचा होता. उत्तेजन देण्याचा होता.

शिद्यांची छत्री ऐतिहासिक वास्तू पुण्याचा जिव्हाळ्याचा विषय. महादजी शिंदेंचे नाव मराठ्यांच्या इतिहासात पराक्रमी मुत्सद्दी सेनापती म्हणून प्रसिद्ध आहे. मराठी सत्तेचे संघटन ह्या व्यक्तीने केले. त्यांच्या दहन केलेल्या ठिकाणी नामांकित वारसदारांनी बांधली हिच ती छत्री. 

न्यायधिशांचा बंगला म्हणजे इतिहास प्रसिद्ध वास्तु “संगम”. १७८७ ला ही संदर हवेली ब्रिटिश वकिलाला राहण्यासाठी रेसिडेंट म्हणून मँलेटाला नियुक्त केले. ती एल्फिंस्टनने चांगली सुधारली. त्याला ऐतिहासिक झालर असून ते प्राचिन पुरातत्व स्मारक आहे.

पहिल्या पेशव्यांच्यावेळी पुणे मराठी राज्याचे मुख्य केंद्र होतेपोलिसखाते सक्षम व कार्यकुशल होते. पेशवात दसरा,गणपती, होळी सण समारंभ सार्वजनिक होते.

या पुस्तकातून आपल्याला ऐतिहासिक वारसा कळतो. लेखकाने काही शब्दांना सद्यकाळाला अनुसरून समजणारे शब्द वापरले. उदा: प्रवेशद्वार् (दरवाजा) सिंहासन(गादी). लेखकाची आपल्याला आकलन होइल अशी साधी सोपी भाषा लक्षांत येते. इतिहास समजून घेतांना कंटाळा येत नाही

हे जरूर वाचाच एकदा.

Tuesday, 17 November 2015

जर्मन-मराठी भाषांतरशब्दकोश(German-Marathi bhashantarashabdakosh)पुस्तक : जर्मन-मराठी भाषांतरशब्दकोश
कोशकार : अविनाश बिनिवाले
संपादन निर्मिती : झेलम कानडे

जर्मन शिकणऱ्या मराठी भाषकांसाठी उपयुक्त असा शब्दकोश (डिक्शनरी). या शब्द कोशात प्रत्येक जर्मन शब्दाचा उच्चार दिलेला आहे.
मराठी प्रमाणेच जर्मन भाषेतही नामाचे लिंग आणि त्याचे अनेकवचनाचे रूप अनियमित म्हणेज कुठल्याही नियमानुसार न ठरता केवळ परंपरेने चालत आलेले असते. त्यामुळे प्रत्येक नामाचे लिंग आणि त्याचे अनेकवचनाचे रूपही या शब्दकोशात दिलेले आहे.

This is a German to Marathi dictionary. This dictionary gives pronunciation of every German word. Also for every noun it gender and plural form is mentioned. This book is quite helpful to any Marathi speaker who is learning German.

जर्मन शिका(German Shika)
पुस्तक : जर्मन शिका
लेखक : अविनाश बिनिवाले

भारतात शिकल्या-शिकवल्या जाणाऱ्या परदेशी भाषांमध्ये जर्मन अतिशय लोकप्रिय आहे. महाविद्यालयात आणि खाजगी शिकवण्यांमार्फत अनेक जण जर्मन शिकतात. पण ज्यांना वेळेअभावी किंवा इतर कारणांमुळे शिकवणी वर्गाला जाणे जमत नाही अशांसाठी  हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.

मराठी भाषकांना घरबसल्या जर्मन शिकवणरे हे पुस्तक आहे. जर्मन मधे संस्कृतप्रमाणेच व्याकरणाचे अनेक नियम आणि त्याला अनेक अपवाद असा प्रकार आहे. त्यामुळे व्याकरण टाळून जर्मन शिकणे कठिणच आहे. म्हणूनच या पुस्तकात जर्मनचे व्याकरण सुयोग्य पद्धतीने शिकवले आहे.

सर्वनामे, त्यांची रुपे, विभक्ती, क्रियापदे, काळांप्रमाणे क्रियापद चालवण्याचे नियम, अव्यये ई. सर्व आवश्यक गोष्टी छान समजावून सांगितल्या आहेत. या पुस्तकाच्या आधारे बेसिक व्याकरण शिकून पुढे स्वतः वाचन करून सरावाद्वारे जर्मन लिहिणे-वाचणे नक्कीच शक्य होईल.

प्रत्येक जर्मन वाक्य, त्याखाली त्याचा उच्चार, त्याखाली प्रत्येक शब्दाचा मराठी अर्थ आणि शेवटी मराठी भाषांतर असे दिले आहे. उदा.

Ich      hatte     dich      gestern     abend            gefragt
इश     हाटऽ     डिश्‌      गेस्टेर्न      आऽबन्ट        ग’फ्राक्ट्‌
मी      होतो      तुला      काल        संध्याकाळी    विचारलेलो
मी काल संध्याकाळी तुला विचारलेले होते

त्यामुळे उच्चार, जर्मन मधला शब्दक्रम आणि मराठीशी असलेले साम्य/फरक लवकर लक्षात येतो.

थेट मराठीतून शिकवले असल्याने जे मराठी माध्यमातून शिकले आहेत किंवा ज्यांचं मराठी व्याकरण बरं आहे अशांना या पुस्तकाद्वारे जर्मन शिकणं सोयिस्कर आहे. जर्मन-ते-इंग्लिश आणि इंग्लिश-ते-मराठी असा बौद्धिक प्रवास करावा लागत नाही.

जर्मन शिकू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक अवश्य अभ्यासावे आणि संग्रही ठेवावे.

This book helps you learn German through Marathi. With the help of this book you can learn German from Marathi on your own. Book thoroughly discusses all grammar concepts like pronouns, their forms, verbs, forms as per tenses, conjunctions etc.
Those interested in learning German should study this book and keep it as a reference.
Saturday, 14 November 2015

प्रार्थना - praarthana
पुस्तकाचे नाव - प्रार्थना
लेखिका - माधवी देसाई

निसर्गरम्य गोव्यातल्या एका खेडेगावातल्या पात्रांवर अधारलेली ही कादंबरी आहे. कादंबरीतलं प्रत्येकजण आपपल्या परीने वेगवेगळ्या समस्यांशी झुंजतो आहे - कोणी गरीबीशी, कोणी नवऱ्याच्या स्वभावाशी, कोणी सामाजिक परिस्थितीशी, कोणी जोडपे परधर्मी विवाहाल्या होणाऱ्या विरोधाशी, एका चर्चचा फादर चर्चच्या कठोर नियमांशी,  ई.
एकाच गावात राहणारे गावकरी या अर्थाने ही सर्व पात्रे एकमेकांशी संबंध असणारीच आहेत. पण या पात्रांचे परस्परसंबंध बदलतात, दुरावततात ते नव्याने समोर ठाकलेल्या समस्यांमुळे. आणि समस्यांची उकल करताना काही पात्रांचे संबंध वेगळ्या पद्धतीने नव्याने जुळतात. असा एकूण कादंबरीचा प्रवास आहे. 
कादंबरी छान आहे. 

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

अनोळखी वाटा Anolakhi vata

झुम्पा लाहिरी या ख्यातनाम लेखिकेच्या दीर्घकथांचे हे पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद शुभदा पटवर्धन यांनी केला आहे.

एका ओळीत सांगायचं तर मला या कथा फार आवडल्या नाहीत. सुरुवातीच्या दोनतीन कथा मी वाचल्या पण सगळ्याच कथा इतक्या सपक, अळणी आणि काहीही विशेष न जाणवणाऱ्या असल्याने पुस्तक पूर्णच वाचू शकलो नाही.

या कथा अमेरिकेत घडणाऱ्या आणि अनिवासी भारतीय पात्र असणऱ्या आहेत. पण अनिवासी भारतीय असल्याने गोष्टीत कही खास फरक पडला असं वाटत नाही. एकूणच कुठल्याही अमेरिकन किंवा आशियाई अमेरिकन कुटुंबात घडू शकतील अशा कौटुंबिक गोष्टी आहेत.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटलं आहे तसं कथाबीज छोटं आहे आणि म्हणूनच घडणारे प्रसंग आणि त्यातले तपशील विनाकारण वाटतात.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

Sunday, 25 October 2015

माझंही एक स्वप्न होतं - majhahi ek swapna hota

माझंही एक स्वप्न होतं- वर्गीस कुरियन

"अमूल" हे भारतात सर्वदूरख्यातनाम असं नाव. पावभाजी बरोबरच्या बटरला समानार्थी शब्द म्हणजे "अमूल". अमूलचे वेगवेगळी दुग्धजन्य पदार्थ बाजारात लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे अमूल ने शेतकऱ्यांना, खेडूतांना एकत्र आणून रोजगार निर्मिती केली हेही तितकंच महत्त्वपूर्ण आहे.

हे पुस्तक "अमूल" च्या जन्माची आणि वाढीची कथा आहे. सरकारी पातळीवरची आस्था-अनास्था, परदेशी कंपन्याची स्पर्धा, नवीन तंत्रज्ञान निर्मितीचं आव्हान अशा नागमोडी वाटेवर प्रवास करत अमूल कशी नावारुपाला आली याची ही कथा.

अतिशय प्रेरणादायी चरित्र.
तुम्ही जर बरोबर असाल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवा यश मिळेल हे बिंबवणारे चरित्र.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

तांडव-taandav

महाबळेश्वर सैल यांची तांडव ही कादंबरी आपल्याला त्या काळातल्या गोव्यात घेऊन जाते जेव्हा पोर्तुगीज आक्रमण गोव्यावर नव्यानेच होत असतं. साम-दाम-दंड-भेद वापरून पोर्तुगीज धर्मान्तर कसे राहिले याचं चित्रण आहे.

आत्तापर्यंत झालेली आक्रमणं लढाया या राजकीय असायच्या सांस्कृतिक किंवा धार्मिक नाहीत. त्यामुळे अशा आक्रमणासाठी जणू समाज गाफिल होता. धार्मिक रुढींचा पगडा, जातिपातित विभागलेला समाज, वर्षानुवर्षांच्या स्थैर्याने लढाऊ पणा विसरलेला समाज म्हणजे धर्मवेड्या, क्रूर आणि सशस्त्र पोर्तुगीजांसाठी सोपा घास ठरू लागला.

देवळे पाडली गेली. देवच त्या गोऱ्या माकडाना शिक्षा करेल असं म्हणत चरफडण्याशिवाय पर्याय नव्हता. कोणी परागंदा झाले. गावाच्या सामाईक जमिनीच्या वारसा हक्क मिळावा म्हणुन लाचारिने कोणी ख्रिश्चन झाले. ख्रिश्चन झालेल्याशी चुकून सम्बन्ध आला तर आपण बाटलो,आता आपण हिन्दू नाही असा स्वतःचाच समज करुन बाप्तिस्मा घेऊ लागले. भीतीने आपणहूनच हिन्दू धर्माचार सोडत गेले.
एकएक वासा ढळत गेला.

नक्की वाचण्यासारखं आहे हे पुस्तक.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

અકૂપાર-अकूपार-Akooparगीरच्या जंगलावरचं हे पुस्तक मी गुजराथीतून वाचलं.  एकदम वाचनीय. गीरचं जंगल, त्यातले सिंह,  त्यातल्या वनवासींचे त्यांच्याशी असलेले प्रेमाचे संबंध या सगळ्याचं चित्रण आपल्याला गीरलाच घेऊन जातो.

निसर्गातली आव्हानं, वनवासींनी त्याच्याशी जुळवून घेत-एकरूप होत घडवलेली जीवनशैली माझ्या सारख्या शहरी व्यक्तीलाही अंतर्मुख करते.

या पुस्तकाचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. ते मी वाचलं नाही. पण मूळ गुजराथी पुस्तकच शक्य असेल त्यांनी वाचावं

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

हिंदू:जगण्याची समृद्ध अडगळ Hindu: Jaganyachi sammruddh adagalअतिशय कंटाळवाणं. का लिहिलंय तेच कळत नाही. आणि आपण का वाचतोय ते कळत नाही.

गावा गावात घडणाऱ्या रिकामटेकड्या पारावरच्या गप्पा  रेकोर्ड करून लिहून काढल्या आहेत असं वाटतं.
त्या तात्पुरत्या मनोरंजक वाटतात पण त्यातून हाती काही लागत नाही. आणि या गप्पा पण कुठलाही आगापिछा नाही सूत्र नाही अशा पद्धतीने मांडल्याने एखाद्या गावकऱ्याची दारूच्या नशेत केलेली असंबद्ध बडबड वाटते.

एकूणच हे पुस्तकच "वाचनालयातील एक असमृद्ध अडगळ" आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

गेशा ऑफ गिओन Geisha of Gionगेशा म्हणजे जपान मधील नर्तिका. आपल्याकडे बऱ्याच वेळा गैरसमजापोटी त्यांना वेश्या समजलं जातं. माझाही हा गैरसमज या पुस्यकाच्या वाचनातून दूर झाला.

त्या जपानी पारंपारिक चहापानाच्या प्रसंगी पाहुण्यांना आदबीने चहा देणे, त्यांच्याशी गप्पा मारून वातावरण प्रसन्न करणे, पारंपारिक नृत्त्य सादर करणे हा त्यांचा व्यवसाय.
त्यासाठी या मुलींना लहानपणा पासून अतिशय कठोर मेहनत करावी लागते. आतिशय वजनदार वस्त्र प्रावरणं (किमोनो) अंगावर घालावी लागतात. तासन्‌तास चालणारा मेकप आणि केशभूषा संभाळावी लागते.  नाच शिकण्याचे, सादर करण्याचे अतिशय कडक नियम पाळावे लागतात.

काही जपानी शब्द त्यामुळे लक्षात राहिले आहेत. गेशा, गेको (या गेशा स्वतःला गेको अर्थात नृत्यसेविका म्हाणतात), मिनेको ( लहान गेको), ओचाया (चहापानगृह), ओकाया (या नर्तिकांचं वसतिस्थान), ओकेसान (मोठी बहीण), आतातोरी ( ओकाया प्रमुखाची वारसदार) ई.

एकूणच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- आवा ( आवर्जून वाचा )
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

चिकन सूप फॉर सोल Chicken soup for soulपरिश्रम, सद्द्विचार, संघर्ष, सकारात्मक विचार या बद्दल प्रेरणा देणाऱ्या कथा आहेत यात.
मला हे पुस्तक फार आवडलं नाही. कथा खूपच बाळबोध वाटल्या.  एक दोन पानात लघुकथा/ प्रसंग दिले आहेत त्यामुळे त्या कथांमधलं नाट्य, कंगोरे जाणवत नाही. आशय जो कथा वाचायच्या आधीच कळलेला असतो. पण तो मनाला पुन्हा भिडत नाही.

-------------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
-------------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
-------------------------------------------------------------------------------------

The Watson Dynasty वॉटसन डायनॅस्टी

The Watson Dynasty
A book about first and second CEOs of IBM and Father-Son.. Thomas J. Watson and Thomas J. Watson Jr.

A nice to read book. Talks more about nature and behavior of these persons, their interaction with each other and IBM senior employees. It is more about human side of first 50 yrs of IBM.

आयबीएम चे पहिले आणि दुसरे सीईओ -  वॉटसन पितापुत्र - यांच्या बद्दलचं हे पुस्तक आहे. त्यांचे स्वभाव, वागण्याची शैली, विचार करण्याची शैली यातून आयबीएमला कसा आकार येत गेला. "आयबीएम"वर बरा वाईट परीणाम कसा झाला याचा सविस्तर ऊहापोह या पुस्तकात केला आहे.
या पितापुत्रांचे एकमेकांशी, त्यांच्या कुटुंबियांशी  आणि कंपनीतल्या उच्चपदस्थांशी कसे संबंध होते हे यातून उलगडतं. आणि त्यांच्या या स्वभाव घडणीमागे काय कारणं होती याचा शोध घेताघेता त्यांचं चरित्रही आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.