पुस्तक - बियॉंड सेक्स (Beyond sex)
लेखिका - सोनल गोडबोले (Sonal Godbole)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - ९६
ISBN - 978-93-88009-85-0
ही ९६ पानी एक छोटेखानी कादंबरी आहे. कादंबरीची गोष्टही तशीच छोटी आहे. दोन मध्यमवयीन, सुखवस्तू, मुलं बाळं असलेले विवाहित स्त्री आणि पुरुष - मीरा आणि सागर - एकमेकांकडे आकर्षिले जातात. एकमेकांना भेटत राहतात. पण मर्यादेत राहून एकमेकांशी शरीससंबंध न ठेवणारे मित्र-प्रेमिक बनून राहतात. त्यांच्या घरच्यांनाही ते मान्य असतं. ही कादंबरी म्हणजे त्यांच्या भेटीचे, गप्पांचे, पिकनिकचे प्रसंग आहेत.
कादंबरी च्या नावातून काहितरी सनसनाटी निर्माण करायचा प्रयत्न केलाय पण कादंबरीत नाट्य नाहीच.
त्यांच्या संसारात असं काय कमी असतं ज्यामुळे त्यांना इतर व्यक्तीची ओढ वाटावी हे नीट समजत नाही. शारीरिक आकर्षण हेच कारण वाटतं. मग एकमेकांमध्ये "सुरक्षित अंतर" ठेवताना त्यांच्या मनाची काय घालमेल होत असेल हे "ताणेबाणे" लेखिकेला दाखवता आले नाहीयेत. अगदी सहज प्रेमात पडतात अगदी सहज दूर राहतात.
त्यांच्या घरचे, मुलं, शेजारपाजारचे सुद्धा काहीच विचारत नाहीत. मीराचा नवरा तर, "अरे वा, छान मित्र मिळाला" असल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. हे असं खऱ्या आयुष्यात घडलं तर चांगलंच आहे. पण तसं होत नाही ना; त्यामुळे ते खोटं वाटतं आणि कादंबरी म्हणून नाट्यहीन सपक वाटतं.
दोघांच्या भेटीचा एक प्रसंग
त्यांच्या घरचे, मुलं, शेजारपाजारचे सुद्धा काहीच विचारत नाहीत. मीराचा नवरा तर, "अरे वा, छान मित्र मिळाला" असल्या पद्धतीने प्रतिसाद देतो. हे असं खऱ्या आयुष्यात घडलं तर चांगलंच आहे. पण तसं होत नाही ना; त्यामुळे ते खोटं वाटतं आणि कादंबरी म्हणून नाट्यहीन सपक वाटतं.
दोघांच्या भेटीचा एक प्रसंग
मीराचा मित्र सागर आणि नवरा समीर ह्यांच्या संवादाचा एक प्रसंग
सुरवातीला असं वाटतं की भेटणारा माणूस मीराला फसवणारा असेल, मग वाटतं "काही तरी मागच्या जन्माचं रहस्य" असेल, मग वाटतं अजून काहीतरी आक्रीत घडणार आहे पण सगळे धागे लेखिकेने तसेच सोडून दिले आहेत. भराभर वाचून आपण कादंबरी संपवतो.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————
No comments:
Post a Comment