भाषा - मराठी (Marathi)
आवाजाचा विनोदी दिवाळी अंक नेहमी प्रमाणेच मजेशीर आहे. बाकी प्रत्येक दिवाळी अंकावर दिसणारं कोरोनाचं सावट या अंकावर नाही. कथा, विडंबन कविता, व्यंगचित्रे आणि चावट-द्वयर्थी खिडकी चित्रे हा नेहमीचा मसाला आहे. कथा प्रचंड हसायला लावणाऱ्या, लक्षात राहतील अश्या वाटल्या नाहीत, माफक निखळ मनोरंजन करणारी आहेत. पाणचट विनोदी नाहीत. त्यामुळे कोरोनामुळे कंटाळवाण्या झालेल्या दिवसांत पुन्हा कोरोना आणि त्याचे परिणाम असला गंभीर, कंटाळवाणा मजकूर वाचावा लागत नाही.
अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया.
विडंबन कवितांचं एक उदाहरण
दिवंगत व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्या गेल्या काही वर्षांत प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रांची एक मालिका आहे
शहरी आणि ग्रामीण बाजाच्या गोष्टी; प्रमाण भाषेतल्या गोष्टी तसेच मालवणी, वैदर्भी भाषेतल्या बोली वापरलेल्या गोष्टी सुद्धा आहेत. कोकणातल्या एका गोष्टीची ही एक सुरुवात
एकेका मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित व्यंगचित्र मालिका आहेत. उदा. सध्या ज्याचा सुळसुळाट झाला आहे ते ऑनलाईन शिक्षण, ट्रेनिंग इ. बद्दल
कल्पना रंजन (फँटसी) स्वरूपाची विनोदी कथा सुद्धा आहे
दोन क्षण मजेशीर घालवायला हा दिवाळी अंक नक्की वाचा.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment