पुस्तक - बायकांत पुरुष लांबोडा (Baykant Purush Lamboda)
लेखक - डॉ. शंतनू अभ्यंकर (Dr. Santanu Abhyankar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २०७
प्रकाशन - विश्वकर्मा पब्लिकेशन्स, ऑक्टोबर २०२२
ISBN - 978-93-93757-37-1
छापील किंमत - रु. ३००/-
मागच्या वर्षी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराणा याचा "डॉक्टर जी" नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. स्त्रीरोगतज्ञ/प्रसूतीशास्त्र म्हणजे गायनाकोलॉजी शिकणारा मुलगा असतो तो. स्त्रियांच्या खाजगी अवयवांची चर्चा मुलांनी करणे नेहमीच्या आयुष्यात आपण असभ्य समजतो. पण इथे तर त्या मुलाला त्याचा अभ्यास करायचा होता. त्यातून आलेले ओशाळलेपण, गोंधळलेपण, इतकंच काय महिला सिनियर्सनी केलेले रॅगिंग, प्रसूतीची पहिली केस हाताळायचा अनुभव वगैरे अनेक प्रसंग त्यात विनोदी पण संवेदनशील पद्धतीने गुंफले होते. मस्त होता चित्रपट. या चित्रपट प्रदर्शनाच्या आसपासच याच विषयाशी संबंधित शीर्षक असलेलं डॉक्टर शंतनू अभ्यंकर यांचं "बायकांत पुरुष लांबोडा" हे पुस्तक प्रकाशित झाल्याचं कळलं होतं. त्यामुळे तेव्हापासून या पुस्तकाची उत्सुकता होती. आता वर्षभराने ते पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा योग आला.
लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे नाव वेगवेगळ्या वृत्तपत्रातल्या त्यांच्या लेखांमुळे अनेकांना माहिती असेलच. ते स्वतः प्रसूती आणि स्त्रीआरोग्यतज्ञ तज्ञ डॉक्टर आहेत. पण पुस्तकाच्या शीर्षकांशी संबंधित एकच लेख या पुस्तकात आहे. पण बाकीचे बहुतांश लेख एकूणच वैद्यकशास्त्रावर आधारित आहेत. तर एक दोन समाजशास्त्रावरचे लेख आहेत.
पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी आपला डॉक्टर होण्याचा प्रवास कसा झाला हे सांगितला आहे. एमबीबीएस होण्याआधी ते चक्क होमिओपॅथी डॉक्टर होते. होमिओपॅथीचा अभ्यास करताना होमिओपॅथी हे आधुनिक विज्ञानाला पटणारी नाही, तर्कशुद्ध नाही याची त्यांना खात्री पटली. म्हणून त्यांनी होमिओपॅथी कोर्स पूर्ण करूनही त्याची प्रॅक्टिस केली नाही. तर पुन्हा मेडिकल प्रवेश परीक्षा देऊन एमबीबीएसला ॲडमिशन घेतली. पुढे ग्रॅज्युएशन वगैरे केलं. पुस्तकाचा पहिला भाग त्यांच्या ह्या वर्षांवर आहे. होमिओपॅथी हे छद्मविज्ञान कसं आहे, तर्काच्या कसोटीवर कसं उतरत नाही याबद्दल त्यांनी त्यांची मतं ठामपणे मांडली आहेत. "व्हायटल एनर्जी" असं काहीतरी सिद्ध न करता येणाऱ्या तत्वांवर ती आधारित आहे, होमिओपॅथी डॉक्टर पण कसे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात; शिक्षक सुद्धा प्रामाणिक उत्तरं न देता "आहे हे असं आहे" अशी उत्तरं देतात, ॲलोपॅथीला नावं ठेवणं शिकवलं जातं वगैरे अनुभव त्यांनी सांगितले आहेत. हा लेख पूर्वी एका मासिकात प्रकाशित झाला होता. साहजिकच त्यावर होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आणि होमिओपॅथी मानणाऱ्या व्यक्तींच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. लेखकाने त्यातील प्रातिनिधीक प्रतिक्रिया पुस्तकात दिल्या आहेत. लेखकाच्या मताचा टोकाला जाऊन विरोध करणारे, प्रसंगी त्यांची खिल्ली उडवणारे असे लेख सुद्धा छापण्याचं धाडस लेखकाने दाखवलं आहे. सर्व प्रतिक्रियांना प्रत्युत्तर म्हणून स्वतः लिहिलेला एक दीर्घ लेख यात आहे. अश्याप्रकारे पुस्तकाची पहिली ८० पाने होमिओपथी विरुद्ध ॲलोपथी अश्या वादावर आहेत. त्यानंतरच्या लेखात सुद्धा ॲलोपॅथी( किंबहुना आधुनिक वैद्यकशास्त्र) हे कसं तर्क-प्रयोग-संशोधन ह्यावर आधारित आहे आणि इतर उपचार पद्धती अशा अशास्त्रीय आहेत याबद्दल छान समजावून सांगितलं आहे. एखाद्या औषधाने बरं वाटलं म्हणजे ते औषध योग्य असा अर्थ होत नाही. बरं "वाटलं" का रोगी बारा "झाला"? औषधामुळे बारा झाला आणि कशामुळे ? वगैरे संशोधन आधुनिक वैद्यकात होतं. निष्कर्ष समोर ठेवले जातात. इतर उपचार पद्धतीमध्ये तसं होत नाही हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे आणि तो त्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगितले आहे. स्वतःच्या चुका मान्य करणं; आजच्या संशोधनानुसार योग्य वाटते आहे उद्या संशोधनांती चुकीचं ठरू शकतं हे मान्य करायला आधुनिक वैद्यक तयार आहे; इतर उपचारपद्धती नाहीत हे त्यांनी पुन्हा पुन्हा सांगून अधोरेखित केलं आहे. ह्या चर्चेतून वाचकांचे प्रबोधन नक्कीच होईल. दोन्हीकडचे साधक-बाधक मुद्दे कळतील. आणि ही चर्चा कधी सर्वमान्य निष्कर्षांपर्यंत पोचणार नाही याची जाणीव होते. शेवटी प्रत्येकाने आपल्या पुरता त्याचा निर्णय घेतला पाहिजे.
मग लेखांचा दुसरा टप्पा येतो. डॉक्टर म्हणून काम करताना येणारे अनुभव, काही आठवणी सांगितल्या आहेत. "जनरल प्रॅक्टिशनर" अर्थात जीपी म्हणजे असे डॉक्टर जे दुसऱ्या डिग्री घेऊन कोणाच्या हाताखाली काम करत शिकतात, दवाखाना थाटून लोकांना वैद्यकीय सेवा देतात, हळूहळू छोटी छोटी ऑपरेशन करायला लागतात आणि "स्पेशालिस्ट" डॉक्टरांना रुग्णपुरवठा करतात. अश्या जीपी लोकांची कामाची तऱ्हा कशी असते, जीपी लोकांचं आणि स्पेशालिस्ट डॉक्टरांचे नातं कसं असतं ते खूप मजेशीर पद्धतीने सांगितलं आहे.
गायनॅकोलॉजिस्ट म्हणून येणारे मजेशीर अनुभव "बायकांत पुरुष लांबोडा" लेखात आहेत. "ती बाई आणि ती सभा" या लेखात एका "केस"चा अनुभव आहे. त्यांच्या दवाखान्यात आलेल्या एका अत्यवस्थ बाळंतिणीचा मृत्यू झाल्यामुळे सरकारी चौकशीला सामोरे जावे लागले त्याचा अनुभव आहे. ती बाई वेगवेगळ्या दवाखान्यात जाऊन शेवटी लेखकाच्या दवाखान्यात पोचली. मरणासन्न अवस्थेतच. तिच्या अवस्थेवरून मृत्यू नैसर्गिकच दिसत होता. चौकशी मध्ये आधीच्या दवाखान्यांनीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या योग्य काम केले होतं हे दिसत होतं. पण अजून चौकशी झाल्यावर कळलं की त्या अत्यवस्थ अवस्थेत पोचण्याचं मूळ कारण काहीतरी वेगळंच आहे. खरोखरी घडलेली ही रहस्य कथाच आहे.
"भाषा डॉक्टरांची" आणि "मराठीचे प्रयोग" हे वैद्यकीय क्षेत्रातल्या गमतीजमती सांगणारे आहेत. प्रत्येक क्षेत्राचे काही पारिभाषिक शब्द असतात. तसेच नेहमीच्या शब्दांना ह्या क्षेत्रात काही वैशिष्टयपूर्ण अर्थ असतो. हे शब्द आपल्या सहकाऱ्याला योग्य आशय पोचवण्यासाठी कसे वापरले जातात त्यांची मजेशीर उदाहरणं दिली आहेत. तर शुद्ध सोपे मराठी प्रतिशब्द वापरून वैद्यकीय ज्ञान मांडता येतं हा त्यांचा निश्चय त्यांनी वेगवेगळ्या लेखांतून व भाषणातून कसा अमलात आणला त्याची उदाहरणे दिली आहेत. श्रोत्यांना त्याची गंमत वाटली, आश्चर्य वाटलं तर काही वेळा त्यातून समाजप्रबोधन सोपं झालं. खुद्द हे पुस्तक मराठी वापराचं जिवंत उदाहरण आहे. मराठी तांत्रिक शब्द वापरले आहेत. इंग्रजी शब्द वापरताना मराठी प्रतिशब्द सुद्धा दिला आहे. त्यामुळे त्यांचा मराठीचा प्रयोग 100% यशस्वी आहे. एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मराठीच्या अभिमानाचे पोकळ ढोल वाजवणारे लोक; "अमृताते पैजा जिंके" आणि "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" वगैरे म्हणत नुसते नाचगाणी करणारे लोक जर मराठीचा सक्रिय वापर करू लागली आणि तज्ञ मंडळी जर मराठीचा असा ज्ञानपूर्ण व सहज वापर करू लागली तर मराठी भाषेबद्दलचा न्यूनगंड कमी होईल हे नक्की.
पुढचे दोन लेख स्त्रीपुरुष लैंगिक संबंध आणि त्याबद्दल असलेले समज गैरसमज ह्यांवर आहेत. अश्लील(पोर्नोग्राफीक) चित्रफितींतून शरीरसंबंधाबद्दल नको नको त्या अपेक्षा मुलामुलींच्या मनात तरुण वयापासून डोक्यात बसतात. वयात आल्यावर कुतूहल असणं नैसर्गिक आहे. पण पॉर्न बघणं आवडू लागतं ते बऱ्याचवेळा व्यसनाचं स्वरूप घेतं. ज्याप्रमाणे दारू, अमली पदार्थ सुरुवातीला आनंद देतात पण नंतर त्यांच्याशिवाय राहणंच कठीण होतं, ती शरीराची गरज होते; तसंच ह्या अश्लील व्यसनाचंही होतं. हे असं का होतं; माणसाला व्यसन कसं लागतं; पुढे पुढे प्रत्यक्ष शरीर संबंधापेक्षाही विकृतदृश्यांची चित्र किती बघण्याचा शौक वाढत जातो; त्यासाठी शरीरातली हार्मोन कशी कारणीभूत ठरतात; त्यावर उपाय काय अगदी छान सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. "दारुडे"प्रमाणे "पॉर्नाडे" असा नवीन शब्द त्यांनी वापरला आहे.
पुस्तकाच्या पुढच्या भागातले पुढचे लेख कोरोनाविषयी आहेत. विषाणू(व्हायरस) म्हणजे काय, साथ का येत, का पसरते किंवा का पसरत नाही, लस म्हणजे काय वगैरे वैज्ञानिक सामान्य ज्ञान दिलं आहे
"विज्ञान विचार" भागातले लेख म्हणजे पहिल्या भागातल्या मुद्द्यांची पुनरावृत्ती आहे. पण फक्त औषध/उपचार हा परीघ न ठेवता एकूणच समाजशास्त्र आणि समाजव्यवस्था अशी व्याप्ती वाढली आहे. डार्विन चा सिद्धांत काय आहे; माकडापासून माणूस झाला असं नाही तर दोन्हीचे पूर्वज होत होते; असे बदल का झाले असतील; त्यामागे एखाद्या विधात्याचा हात कसा नाही; आणि हे सगळं घडण्यामागे सुद्धा निश्चित हेतू नाही हा सिद्धांत त्यांनी समजावून सांगितला आहे. त्याचबरोबर डार्विनवर घेतलेले काही आक्षेप कसे चुकीचे होते. त्याचा थोडक्यात मागोवा घेतला आहे. हा विषय काही एका लेखात मावणारा नाही. तरी है लेखातून विषयाची चांगली ओळख होते.
माणसाचं आयुष्य आता पूर्वीपेक्षा सुखकर झालं आहे हा सामाजिक शास्त्रीय निष्कर्ष मांडणाऱ्या पुस्तकाबद्दल पुढचा लेख आहे, पूर्वी पेक्षा आता युद्ध कमी होत आहेत उपासमारीने मरणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. जीवनमान वाढलं आहे. आपल्या आजूबाजूला आणि रोजच्या जगण्यात संघर्ष नक्की आहे पण हजारो वर्षांचा माणसाचा इतिहास बघितला तर त्यापेक्षा आपण खूप बरे हे मानायला नक्की जागा आहे ते त्यांनी स्पष्ट केले आहे. आणि असं होण्यामागे मानवतावाद, विवेकवाद कसे आहे आणि ते पुढे कसे चालू राहिले पाहिजे याचं प्रतिपादन केलं आहे.
महाराष्ट्रात "अंधश्रद्धा निर्मूलन समिती" प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीचं काम करणारी संस्था आणि व्यक्ती अमेरिकेत आहेत. त्या संस्थेच्या एका परिषदेला लेखक अमेरिकेत उपस्थित होता. तेव्हा लोकांनी काय काय अनुभव सांगितले, तिकडे संस्था कशा काम करतायत ह्याचा आढावा घेतला आहे.
काही पाने उदाहरणासाठी
अनुक्रमणिका

होमिओपॅथी म्हणजे भोंदूगिरी ..
अभ्यंकरांना नाचता आलं नाही म्हणून होमिओपॅथीचं अंगणच वाकडं ?? अशा लिहिणाऱ्या प्रतिक्रिया
भाषा डॉक्टरांची
गायनॅकोलॉजिस्ट म्हणून येणारे मजेशीर अनुभव "बायकांत पुरुष लांबोडा" लेखात आहेत. हे पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यामुळे मला वाटलं होतं की अनुभव, त्यात येणाऱ्या अडचणी, त्याचे फायदेतोटे किंवा केलेली कामे हा सगळा भाग पुस्तकात. मुख्य असेल. तसं होत नाही. पुस्तकाचं शीर्षक आणि पाठमजकूर (ब्लर्ब) आणि समर्पक नाही. ते वेगळं पाहिजे होतं.
आधुनिकविज्ञान, बुद्धीप्रामाण्य, तर्काच्या आधारे विचार करण्याची पद्धत, आपल्याला सगळं माहिती नाही हे मान्य करण्याचा मोठेपणा, चुकांतून शिकण्याचा समंजसपणा, धार्मिक ग्रंथांच्या मागे न लागता इहवादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे एकूण या पुस्तकाचे सार आहे. साहजिकच यात काही धार्मिक बाबींना छेद दिला जातो. पण फक्त हिंदू किंवा फक्त भारतीय यांना टार्गेट न करता त्यांनी एक तर विवेचन जनरल ठेवलं आहे किंवा इतर धर्मांचेसुद्धा उल्लेख दिले आहेत. त्यामुळे निवेदन एकांगी होत नाही. वाचकाला विचारप्रवृत्त करतं.
पुस्तकाची सर्वात मोठी जमेची की बाब म्हणजे लेखकाची भन्नाट लेखन शैली. आपण विनोदी पुस्तक वाचतो आहोत असेच आपल्याला वाटेल. बऱ्याच शब्दिक कोट्या आहेत. वाक्यरचनांची गंमत आहे. घटनेकडे बघण्याची तिरकस पद्धत आहे. सहज जाता जाता काढलेला चिमटा आहे. त्यामुळे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आपण सलग वाचत जातो. मजा घेत जातो. महत्त्वाचे मुद्दे, तांत्रिक मुद्दे आणि गंभीर मुद्दे आपल्यासमोर येतात; पण अगदी हलक्याफुलक्या स्वरूपात. त्यामुळे ते कळतात पण रटाळ होत नाहीत.
अभ्यंकर सरांचा होमिओपॅथीला विरोध आहे तरी( किंबहुना म्हणूनच थट्टेने ) असं म्हणावसं वाटतं की हे पुस्तक म्हणजे होमिओपॅथीच्या गोड गोळ्या आहेत. त्यातून तुमच्या मेंदूला औषध मिळेलच आणि खुसखुशीत वाचनाने तोंड गोडही होईल.

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————