अनोळखी वाटा Anolakhi vata

झुम्पा लाहिरी या ख्यातनाम लेखिकेच्या दीर्घकथांचे हे पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद शुभदा पटवर्धन यांनी केला आहे.

एका ओळीत सांगायचं तर मला या कथा फार आवडल्या नाहीत. सुरुवातीच्या दोनतीन कथा मी वाचल्या पण सगळ्याच कथा इतक्या सपक, अळणी आणि काहीही विशेष न जाणवणाऱ्या असल्याने पुस्तक पूर्णच वाचू शकलो नाही.

या कथा अमेरिकेत घडणाऱ्या आणि अनिवासी भारतीय पात्र असणऱ्या आहेत. पण अनिवासी भारतीय असल्याने गोष्टीत कही खास फरक पडला असं वाटत नाही. एकूणच कुठल्याही अमेरिकन किंवा आशियाई अमेरिकन कुटुंबात घडू शकतील अशा कौटुंबिक गोष्टी आहेत.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटलं आहे तसं कथाबीज छोटं आहे आणि म्हणूनच घडणारे प्रसंग आणि त्यातले तपशील विनाकारण वाटतात.

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
ना
वाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi)

पुस्तक - वर्दीतल्या माणसाच्या नोंदी (Vardeetalya manasachya nondi) लेखक - सदानंद दाते (Sadanand Date) भाषा - मराठी (Marathi) पाने - १४४ प्रक...