पुस्तक - टु किल या मॉकिंग बर्ड (To kill a mockingbird )
लेखिका - हार्पर ली (Harper Lee)
अनुवादक - विद्यागौरी खरे (Vidyagauri Khare)
भाषा - मराठी (Marathi)
मूळ पुस्तक - To kill a mockingbird (टु किल या मॉकिंग बर्ड)
मूळ पुस्तकाची भाषा - इंग्रजी (English)
पाने - २४६
ISBN - 978-81-95235-05-6
१९६० साली प्रकाशित झालेल्या पुरस्कारप्राप्त इंग्रजी कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे. १९३० च्या आसपासच्या कालखंडात ग्रामीण अमेरिकेतील एका लहानश्या गावात घडणारे हे कथानक आहे. ॲटिकस नावाचा वकील आपल्या दोन शाळकरी मुलांबरोबर राहत आहे. ह्या मुलांच्या लहानपणीच त्यांची आई वारल्याने, कॅलपुर्निया नावाची एक कृष्णवर्णीय महिला मुलांना सांभाळायला घरी काम करते आहे. गोऱ्या लोकांकडून कृष्णवर्णीयांना कमी लेखण्याचा, वंशभेदाचा हा काळ. परंतु ॲटिकस मात्र कृष्णवर्णीयांशी सहृदयतेने वागतो आहे. एक माणूस म्हणून काळ्या लोकांनासुद्धा गोऱ्यांसारखाच सन्मानाने जगण्याचा, न्यायाचा अधिकार आहे हे तो मनोमन मानतो. वंशभेदाला विरोध करण्यासाठी तो बंड करून उठला नसला तरी त्याच्या वागण्यातून हे दिसतं. म्हणूनच आपल्या मुलांवर सुद्धा तो संस्कार करतो आहे आपल्या वागण्यातून, मुलांच्या नकळत. सहृदयता, सद्सद्विवेकबुद्धी, ज्ञानाची आस, दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायची वृत्ती, क्षमा करण्याची वृत्ती, वाचनाची आवड अश्या कितीतरी गोष्टी तो स्वतः जगतो आहे. मुलांशी बोलताना, त्यांना समजावून सांगताना, वेळप्रसंगी रागे भरताना तो संवेदनशीलपणे वागतोय. वडिलांशी मैत्रीचं, आदराचं नातं म्हणूनच निर्माण झालंय. त्याची मुलं - जेम आणि स्काऊट - अश्या मोकळ्या वातावरणात घरी वाढत असले तरी गाव तितकं मोकळ्या विचारांचं नाही. वंशभेद तर आहेच पण "व्यक्ती तितक्या प्रकृती" ह्या उक्तीप्रमाणे गावात सगळंच काही आदर्श नाही. त्यामुळे घरचे आदर्श आणि गावाचे आदर्श ह्यात मुलांचा गोंधळ होत राहतो. ते गावात काय बघतात; त्यांचे शाळूसोबती काय म्हणतात, त्यांचे नातेवाईक काय टिप्पण्या करतात त्यावर ॲटिकस काय बोलतो ह्यातून त्यांच्या बालबुद्धीचा विकास होत राहतो.

हे सगळे प्रसंग लहानगी स्काऊट आपल्याला सांगते. कादंबरीच्या पहिल्या अर्ध्या भागात लहान मुलांच्या खोड्या, गावात घडणारे प्रसंग ह्यातून वेगवेगळ्या पात्रांची नकळत ओळख होते. नेपथ्यरचना साधली जाते. त्यांच्या घराशेजारी राहणारा, कधीही घराबाहेर ना पडणारा रहस्यमय "बू रॅडले" हा त्यांच्या कुतूहलाचा, भीतीचा विषय. काहीतरी करून त्याला बघितलं पाहिजे, त्याला घराबाहेर काढलं पाहिजे ह्यासाठी त्यांच्या खोड्या चालू असतात. अश्याच गमतीजमती चालू असताना त्यांना कळतं की लोक आपल्या वडिलांबद्दल कुसकटपणे बोलतायत. त्याला "निगर-लव्हर" (काळ्या लोकांना विशेष आपुलकीने वागवणारा) म्हणून टोमणे मारतायत. ॲटिकस मात्र लोकांना काही उत्तर द्यायच्या भानगडीत न पडता आपलं काम करत राहतो. एका काळ्या माणसाचा गोऱ्या माणसाविरुद्धचा खटला दाखल झालेला असतो. त्यात काळ्याच्या बाजूने लढायचं काम न्यायालयाने त्याला दिलेलं असतं. लोकांची अपेक्षा अशी असते की त्याने थातुरमातुर खटला लढून गोऱ्याची बाजू जिंकू द्यावी. पण सद्सद्विवेकबुद्धीला प्रमाण मानत तो काळ्या व्यक्तीची बाजू कशी न्याय्य आहे हे पटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. आपल्या वडिलांचा आदर्शवाद, त्याला गावाचा विरोध, तरीही गावावर प्रेम करत राहण्याची वृत्ती मुलं बघत असतात. नकळत शिकत असतात. वयाने मोठी होत असतात. आणि नकळत जाणीवेनेही. ह्या सगळ्यात कधी त्यांच्यावरही संघर्षाचा प्रसंग येतो. तेव्हा लहान मुलांना जितकं झेपेल तितक्या जोरकसपणे विरोधाचा प्रयत्न करतात अगदी इतर मुलांशी मारामारी सुद्धा करतात. पण ॲटिकस कसा वागला असता; ॲटिकस काय म्हणेल ही फूटपट्टी मनात लावूनच.
वडिलांचा मुलांवर आणि मुलांचा वडिलांवर होणारा हा मानसिक परिणाम हे ह्या कादंबरीचं गर्भित सूत्र मला वाटलं. "जग काय म्हणेल" ह्याबद्दल पूर्ण बेपर्वाई करता आली नाही तरी त्यातूनही आपलं स्वत्व जपायचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ह्या सोज्ज्वळ कुटुंबाबाची ही नाट्यमय गोष्ट आहे.
काही पाने वाचा.
घरातून कधीही बाहेर ना पडणाऱ्या "बू रॅडले" ला घराच्या बाहेर आणण्यासाठीचे पोरांचे चाळे
निग्रोच्या खटल्याबद्दल वडिलांशीमुलांचा संवाद. दुसऱ्याबद्दल आगपाखड किंवा स्वतःबद्दल कुठलीही प्रौढी न या मिरवता निखालस तथ्य तेवढं ॲटिकस मुलांना सांगतो तो प्रसंग. (माझ्या मनात विचार आला ह्या खटल्याची माहिती आजच्या वृत्तवाहिन्यांनी दाखवली तर किती मीठ मसाला आणि नाटकीपणा करून सांगतील; नाही का ?)
खटला सुरु झाल्यावर फिर्यादी गोऱ्या माणसाची साक्ष. 'आपण गोरे, आरोपी काळा; मग आपलं कोण काय वाकडं करणार" ह्या गुर्मितली त्याची साक्ष
कादंबरीचा पहिला भाग मुलांच्या खोड्या आणि गावगप्पा हा थोडा कंटाळवाणा आहे. कथानक पुढे जातच नाहीये असं वाटतं. पण एकदा खटल्याचा भाग आला की खूप वेगाने घटना घडतात. न्यायालयातील प्रसंग, तुरुंगातील प्रसंग, त्यातून दिसणाऱ्या वल्ली आणि मानवी स्वभावाचे कंगोरे हे सगळं आपल्याला पुस्तकाशी खिळवून ठेवतं. आधी वाचलेले प्रसंग किंवा लोक ह्यांची सांगड घालता येते. शेवट तर थरारक आणि नाट्यमय वळण घेणारा आहे.
लेखकाच्या वर्णन शैलीतून आपण त्यावेळच्या अमेरिकन खेड्यात जातो. जुन्या अमेरिकेतलं ग्रामीण वातावरण कसं आपल्या गावांसारखंच सारखंच खेडवळ होतं; आपल्याकडे जातींची उच्चनीचता तर तिकडे वर्णांची आणि घराण्याची उच्चनीचता; शेती आणि गावातल्या घडामोडी हेच विश्व असणारे लोक हे साम्य जाणवतं.
विद्यागौरी खरे ह्यांनी उत्तम दर्जाचा अनुवाद केला आहे. सहज, रसाळ. कुठेही कृत्रिमता नाही. "मूळ पुस्तक मराठीच असेल असं वाटतंय" हे अनुवादासाठी ठरलेलं प्रमाणपत्र द्यायलाच पाहिजे. ही सुंदर साहित्यकृती मराठीत आणल्याबद्दल त्यांचे आणि प्रकाशकांचे आभार.
पुस्तकात दिलेली लेखिकेची माहिती
पुस्तकात दिलेली अनुवादिकेची माहिती
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————