अनाहत(Anahat)



पुस्तक - अनाहत (Anahat) 

लेखिका - प्रणिता खंडकर (Pranita Khandkar)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - १३४
प्रकाशन - स्वयंप्रकाशित. २०२२.
ISBN - दिलेला नाही.
छापील किंमत - रु. २००/-


लेखिका प्रणिता खंडकर ह्यांनी पुस्तकाची प्रत मला घरपोच पाठवून माझा अभिप्राय जाणून घ्यायची इच्छा दर्शवली (माझे हौशी पुस्तकपरीक्षण लेखन असले तरी ) ह्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो.

हा कथासंग्रह आहे... माणुसकीच्या गोष्टींचा. स्वतः कुणाला त्रास देऊ नये; उलट अडल्यानडल्याला मदत करावी. आपल्याला होईल तेवढी दुसऱ्याला जगायला उमेद द्यावी. ही आपली मध्यमवर्गीय शिकवण. ही शिकवण मानणाऱ्या आणि अंमलात आणणाऱ्या पात्रांच्या ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या गोष्टींत दोन मुख्य पात्रं आहेत. एक पात्र जे अडचणीत सापडलं आहे असं आणि दुसरं त्याला मदतीचा हात देणार. पात्रांचे परस्परसंबंध वेगवेगळे आहेत. दोन सह-कर्मचारी; बँकेचा अधिकारी आणि खातेधारक; मालक-नोकर तर कधी योगायोगाने एकेमकांना भेटलेल्या दोन अनोळखी व्यक्ती इ. आर्थिक अडचण, कुटुंबीयांचं आजारपण, कर्त्याव्यक्तीचा अपघाती मृत्यू, मानसिक धक्का असे वेगवेगळे प्रसंग आहेत. पण त्यात दुसऱ्याने मदतीचा हात पुढे केल्याने "शेवट गोड" झाला आहे.  मुखपृष्ठावरून हे पुस्तक योग किंवा ध्यान ह्यावरचे असेल की काय असं वाटतं पण कथांत दिसणारी सद्भावना दाखवण्यासाठी मुखपृष्ठाची अशी रचना असावी. 

अनुक्रमणिका

ही एक दोन उदाहरणं बघा
कथा १)



कथा २)




साधारण ५-६ पानांची एकेक कथा आहे. बहुतांश कथांचा साचा सारखा आहे. कथेची सुरुवात आज घडणाऱ्या प्रसंगाने होते. आणि निवेदन लगेच गतवर्णनात(फ्लॅशबॅक) मध्ये जाते. दोन पात्रं एकमेकांना कशी भेटली, मग एकाला 
अडचणी कशा आल्या, दुसऱ्याची मदत कशी झाली हा भाग येतो. आणि पुन्हा आजच्या प्रसंगावर येऊन कथा संपते. मधला निवेदनाचा भाग प्रसंगांतून उभा केलेला नाही. ते सगळं एखाद्या रिपोर्ट प्रमाणे कोरडे तपशील होतात. त्यामुळे गोष्टीतलं कथा-पण फक्त सुरुवातीला आणि शेवटी येतं.
ह्या गोष्टी सुट्या सुट्या वाचायला बऱ्या वाटतील पण सलग एक कथा संग्रह म्हणून वाचताना खूप तोचतोचपणा येतो.
म्हणजे पहिल्या काही गोष्टी वाचल्यावर पुढची गोष्ट वाचताना , असा भाव मनात येतो कि , "हं, आता कुठले कुठले बरं त्रास असातील पात्राला ? गरिबी+आजार हे मिश्रण आले का अपघात+फसवणूक असं काही ?"
भाषा सोपी सरळ आहे. गोष्टींचा वेगही झपाटेदार आहे. त्यामुळे कंटाळा येत नाही. पण आपण खूप गुंतूनही जात नाही.

लेखिकेला कल्पना चांगल्या सुचल्या आहेत. मात्र 
थेट निवेदन न करता त्यांनी पात्रांचं वर्णन संवाद, ह्यातून, काही घटना ह्यातून गोष्ट खुलवली तर जास्त मजा येईल. असं मला वाटलं.

पुस्तक विकत घेण्यासाठी तपशील


प्रणिताजींना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!

———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-




———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...