मालवणी कथा (Malavani Katha)ई-पुस्तक : मालवणी कथा (Malavani Katha)
लेखक : वेगवेगळ्या लेखकांचा कथा संग्रह
भाषा : मराठी (Marathi)
पाने : ८५
ISBN : दिलेला नाही

ब्रोनॅटो (www.bronato.com) या मराठी ईबुक प्रकाशनाने मालवणी बोलीतल्या कथांचे हे ईबुक प्रकाशित केले आहे. ईबुक म्हणजे काय हे जर आधी समजून घ्यायचं असेल तर परीक्षणाच्या शेवटी दिलेला व्हिडिओ पहा. 
ब्रोनॅटोने घेतलेल्या कथा स्पर्धेतून प्रभाकर भोगले - झी मराठी वरच्या "गाव गाता गजाली" या  लोकप्रिय मालवणी मालिकेचे लेखक- यांनी निवडलेल्या १३ कथांचा यात समावेश आहे.मालवणी कथा म्हटलं की इरसाल नमुने, झणझणीत शिव्या आणि भुतंखेतं असणार असा अंदाज तुम्ही बांधला असेलच. तशा कथा आहेतच आणि बाकीही बऱ्याच प्रकारच्या आहेत. गोष्टी लहान असल्याने कथाबीजाबद्दल लिहीत नाही पण काही गोष्टींमधले परिच्छेद देतो ज्यावरून तुम्हाला गोष्टींची कल्पना येईल.

उदा. दुसऱ्या मुलाने नोकरी सोडली म्हणून आपल्या मुलाला नोकरी मिळेल हे कळल्यावर एका व्यक्तीचा आणि नोकरी देणाऱ्याचा संवाद

गोष्टीतली भुताटकी"कोकण बदलतंय" -विकास होतोय, रस्ते होतायत पण त्याच बरोबर हिरव्यागार निसर्गाची हानी होतेय, मोठ्याप्रमाणात बाहेर राज्यातले लोक तिकडे स्थलांतरित होतायत, कोकणी माणूस जामिनी विकतो आहे, वडिलोपार्जित जमिनी, त्यातून उद्भवणारे भाऊबंदकीचे वाद इ. विविध पैलूंवर भाष्य करणार्‍या कथाही आहेत. 
उदा.

मुंबईत छोट्याशा खुराड्यात राहणाऱ्या पोराला गावी आल्यावर आपल्या मातीची-झाडांची सोबत मिळाल्यावर बरं वाटतं आणि त्याची आईही त्याच मायेची गळ घालत त्याला पुन्हा गावात परतायचा आग्रह करते. हा प्रसंग तर प्रत्येक कोकणवासीयाला आपलाच वाटेल.

सगळ्या गोष्टी नवख्या लेखकांनी लिहिलेल्या अाहेत तरी अगदीच बाळबोध झालेल्या नाहीत. थोडी रंजकता, थोडा विनोद, बेताबेताने विचार मांडणे असं सगळं आहे. मालवणी बोलीची मजा घेत घेत वाचायला बर्‍या वाटतात.

त्यात हे ईबुक असल्याने मोबाईलवर आपल्याला हवं तेव्हा वाचू शकतो. आणि ईबुकचे बरेच फायदे आहेत ते तुम्ही पुढच्या व्हिडिओत बघू शकता. मराठीत ईबुक चळवळ रूजण्यासाठी, बोली भाषेतल्या लेखकाला प्रोत्साहन देण्यासाठी अवश्य वाचा. हे ईबुक मोफत आहे. डाऊनलोड करण्यासाठी लिंक
https://play.google.com/store/books/details?id=12xlDwAAQBAJईबुक/ईपुस्तक म्हणजे काय? ईपुस्तकाचे वाचक आणि लेखकांना फायदे 

https://www.youtube.com/watch?v=xCd1-TC-dgk

----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- जवा ( जमल्यास वाचा )
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...