पुस्तक : मना सर्जना (Mana Sarjana)
लेखक : डॉ. अनिल गांधी (Dr. Anil Gandhi)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : २२०
ISBN : 978-81-8498-128-5
ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अनिल गांधी यांचं हे आत्मचरित्र आहे. त्यांच्याबद्दल पुस्तकात दिलेली माहिती
अनुक्रमणिका
सोलापुरात बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या अनिल यांना लहानपणापासून डॉक्टर व्ह्यायची इच्छा होती. परिस्थितीशी झगडत, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांची मदत घेत त्यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. स्वतःचा भार कुटुंबावर पाडणं सोडाच उलट कुटुंबालाच हातभार लावायची गरज असल्यामुळे शाळा-कॉलेजात असताना कधी अर्धपोटी राहून, कधी शिकवण्या घेऊन, कधी अर्धवेळ नोकरी करून, पैसे वाचवून घरी पाठवावे लागत होते.
त्यातला एक प्रसंग :
पुढे त्यांनी छोट्या जागेत प्रॅक्टिस सुरू केली. त्यांच्या हाताला येणारं यश, सचोटीची वागणूक, रुग्णांप्रती सहृदयता यातून नाव, पैसा, प्रसिद्धी आणि समाधान मिळत गेलं. व्यवसायसुद्धा वाढला. हा प्रवास पुस्तकात सांगितला आहे. काही लक्षात राहिलेल्या केसेस सांगितल्या आहेत. उदा.
कौटुंबिक बाबतीतले प्रसंगसुद्धा सविस्तर लिहिले आहेत उदा. त्यांचं लग्न, भावाबहिणीची लग्नं, मुलांची शिक्षणं, खेळात आणि व्यवसायात प्रगती, नवीन घरांचं बांधकाम, गुंतवणूक इ.
अनिल गांधींसारखा सहृदय माणूस व्यावसायिक स्थैर्य आल्यावर सक्रिय समजकार्यात न उतरता तरच नवल. त्यांनी लोणावळ्याजवळ एका आदिवासी पाड्यात तिथल्या आदीवासींना मोफत उपचार द्यायला सुरूवात केली, पुढे त्यांच्यासाठी शाळा काढली. ह्या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, साथीदार कसे मिळाले, लक्ष्मीनिवास मित्तल यांच्यासारख्या प्रसिद्ध उद्योगपतीची साथ मिळाली इ. सांगितलं आहे.
आदीवासींना मदत करताना सुरुवातीच्या दिवसातली ही गंमत वाचा.
पुण्यात धोंडूमामा साठे होमीओपाथी कॉलेज आहे. त्या कॉलेजशी आणि ती चालवणाऱ्या संस्थेत त्यांनी काम केलं. त्याचे कडू-गोड अनुभव पुस्तकात आहेत.
पुस्तकाच्या शेवटी वेगळंच वळण घेत गुंतवणूक कशी करावी, जीवसृष्टीची उत्क्रांती याबद्दल त्यांचे विचार मांडले आहेत. शेवटी खालावत चाललेल्या वैद्यकीय व्यवसायाबद्दल चिंतन आहे.
असं एकूण पुस्तकाचं स्वरूप आहे. पुस्तक वाचायला कंटाळा आला नाही तरी पुस्तक परिणामकारक होत नाही. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या खूप घटना, त्यांच्या संपर्कात आलेल्या कितीतरी लहान मोठी माणसांची नावं पुस्तकात येतात. पण बरेच वेळा; हे असं झालं, मला असं वाटलं, मग पुढे हे झालं, असं वाटलं ... अश्या पद्धतीच्या वर्णनामुळे त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांच्या आयुष्याचा सरकारी अहवाल वाचतोय असं वाटतं.
पुस्तकात जुने नवे फोट हवे होते. पण एकही नाही.
वैयक्तिक घटनांचा तपशीलही खूप येतो. एखाद्याचा घरगुती अल्बम बघितल्यासारखं वाटतं. सर्वांच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी हे लिहिलं असेल हे मान्य, पण त्रयस्थ वाचक त्याच्याशी समरस होऊ शकत नाही.
पुस्तकाच्या शेवटीतर गुंतवणूक कशी करावी, विज्ञानाचे शोध कसे लागले असे याबद्दल त्यांना काय समजलंय हे लिहिलं आहे. हे तर लेखन भरकटल्यासारखं वाटतं.
कष्ट करून नावारूपाला आलेले प्रथितयश डॉक्टर, गरीबीतून श्रीमंत झाल्यावरही पैशाच्या लोभात न अडकता व्यावसायिक शुचिता आणि समाजिक बांधिलकी जपणारं असं अनिल गांधी यांचं व्यक्तिमत्त्व आहे. ते प्रेरणादायी आणि आशादायी असूनही पुस्तक मात्र "तरीही उरे काही उणे" भावना निर्माण करतं.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment