पथेर पांचाली (Pather Panchali)


पुस्तक : पथेर पांचाली (Pather Panchali)

लेखक : बिभूतिभूषण बॅनर्जी ( Bibhutibhushan Banerjee)

भाषा : मराठी (Marathi)

मूळ पुस्तकाची भाषा : बंगाली (Bengali) 

अनुवाद : प्रसाद ठाकूर  (Prasad Thakur)

पाने : ३२८

ISBN : 9789353173890

पथेर पांचाली ही अतिशय लोकप्रिय कादंबरी आहे. याच कादंबरीवरचा सत्यजित रे यांचा चित्रपट सुद्धा खूप गाजलेला आहे . बंगाली भाषेतली कादंबरी प्रसाद ठाकुर यांनी मराठीत अनुवादीत केली आहे


लेखकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती 

अनुवादकाबद्दल पुस्तकात दिलेली माहिती

ब्रिटिश कालीन बंगालमधल्या एका लहानशा खेड्यात राहणाऱ्या एका गरीब ब्राह्मण परिवारातील व्यक्तींची ही गोष्ट आहे. नवरा-बायको आणि त्यांची दोन मुलं(दुर्गा व अपू) ही मुख्य पात्रं आणि आजूबाजूचे शेजारी, गावकरी इत्यादी सहपात्रं असं पुस्तकाचं स्वरूप आहे. गरिबीमुळे शी परिस्थिती अशी भोगावी लागते; कोंड्याचा मांडा करुन राहावं लागतं याचे प्रसंग पुस्तकात आहेत. एकच एक सलग कथानकापेक्षा छोट्या छोट्या घटना एकेका गोष्टीप्रमाणे लिहिल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला नाव आहे. ही त्यावेळच्या कादंबऱ्यांमध्ये आढळणारी नेहमीची पद्धत आहे.

लहान मुले म्हटले  की आपल्या या कल्पनाशक्तीने खेळ खेळणार, लहान मुलांमध्ये रमणार, खोड्या काढणार, काहीतरी चुकीची कामे करून गोंधळ घालणार, तर कधी मारामारी करणार. कादंबरीतल्या बऱ्याचशा गोष्टी या प्रकारच्या आहे आहेत. लहान भावंडांच्या खोड्या, खेळ, भेटणारे मित्र असे प्रसंग यात आहेत. त्याचं एक उदाहरण कवड्यांच्या खेळाचं.




गावातली पोरं म्हटल्यावर त्यांचे खेळ पण दगड, माती, पाणी , झाडंझुडपं यांच्याशी जोडलेले. निसर्गत मुक्त हिंडत आपली लहर होईल तसा आनंद घेत जगायचं. त्यातला एक प्रसंग. 




गरीब माणसाला शारीरिक कष्ट करावे लागतातच आणि मानसिक कष्ट व अपमानही झेलावे लागतात. या अपमानाचे काही प्रसंग पुस्तकात आहेत. दुर्गावर आलेल्या चोरीच्या आळाचा हा प्रसंग.






दुर्दैव सुद्धा कुटुंबाच्या पाचवीला पुजलेलं आहे. त्यामुळे कुटुंबियांचे अकाली मृत्यु धंद्यात अपयश  हे सुद्धा कादंबरीत आहे. नवऱ्याच्या मागे मुलं वाढवताना सर्वजायला मोलकरीण व्हावं लागलं.





अशी अतिशय करूण कादंबरी आहे.  पण "अपू"  सोडला तर इतर पात्रांच्या मनात डोकावायचा खूप प्रयत्न केलेला दिसत नाही केलं. त्यांच्याशी आपण समरस होत नाही. त्यामुळे दुर्दैवाचा दशावतारांची जंत्री असं कादंबरीचे स्वरूप वाटतं .

खेड्यातील जीवन, तिथलं दैन्य, शेतकऱ्यांची वाईट अवस्था इत्यादीवर दिवस आधारित "गोदान", "बारोमास"; लहान मुलाच्या भावजीवनावर आधारित  "पाडस"; "श्यामची आई" ही पुस्तकं प्रचंड प्रभावशाली आहेत . त्यामुळे ही कादंबरी गाजायचं कारण काय हे मला कळलं नाही. कदाचित, शंभर वर्षांपूर्वी पुराणातल्या चमत्कारांच्या, देवादिकांच्या, राजे महाराजांच्या कथा साहित्यातून प्रगट होत असतील; तेव्हा खरं जीवन जसं आहे तसं समोर ठेवणारी कादंबरी असल्यामुळे आवडली असेल. आता अशा प्रकारचे साहित्य खूप लिहिलं जातं. त्यामुळे या कादंबरीचा वेगळेपणा जाणवत नाही. शहर असो वा गाव, आता जगण्याची क्लिष्टता देखील खूप वाढली आहे. त्यामुळे ही कादंबरी फार सपक, सरधोपट वाटते.

अनुवाद मात्र छान झाला आहे. कुठेही बोजडपणा, कृत्रिमपणा आलेला नाही. त्यामुळे वाचताना कंटाळा येत नाही .


----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- 
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------





----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache)

पुस्तक - पासबुक माझ्या आयुष्याचं (Passboook Mazya Ayushyache) लेखिका - आरती संजय कार्लेकर (Arati Karlekar) भाषा - मराठी पाने - १७६ प्रकाशन ...