पुस्तक - ... जरा, याद करो कुर्बानी ( Jara, Yad karo kurbani)
पाने : १००
भाषा : मराठी
सैन्यदलाच्या कौटुंबिक बाजूची सुखदुःखे मांडणारे "घर सैनिकाचे" हे पुस्तक नुकतेच वाचले आणि त्याचे परीक्षण परवा लिहिले होते. (ते http://kaushiklele-bookreview.blogspot.com/2021/01/ghar-sainikache.html इथे वाचू शकाल). योगायोगाने वाचनात आलेले पुढचे पुस्तकही सैन्याशी संबंधित असेच आहे.
डोंबिवलीची "विविसु डेहरा" (www.vivisudehra.com) पर्यटन संस्था गेली अनेक वर्ष पर्यटनाच्या माध्यमातून आपल्या सैन्यदलाची जवळून ओळख व्हावी अशा पद्धतीच्या विशेष सहलींचे आयोजन करते. तसेच सेनेच्या शौर्याची, त्यागाची योग्य जाणीव व कृतज्ञता सर्वसामान्यांच्या मनात वाढीस लागावी यासाठी वेगवेगळे उपक्रम करते. उदाहरणार्थ दिवाळीच्या वेळी सैनिकांना फराळ पाठवण्यात ते पुढाकार घेतात.
या संस्थेने "जरा याद करो कुर्बानी" हे कॉफी टेबल बुक डायरी स्वरुपात छापलं आहे. परमवीर चक्र विजेत्यांची माहिती हा मुख्य विषय आहे. आत्तापर्यंत ज्या 21 शूरवीरांना सेनेतील सर्वोच्च असे "परमवीर चक्र" मिळाले आहे त्या प्रत्येकावर एक छोटेखानी लेख आहे ज्यातून त्यांच्या शौर्याची आपल्याला माहिती होते.
अनुक्रमणिका
उदाहरणार्थ मेजर धन सिंग थापा यांच्यावरचा हा लेख पहा.
परमवीर चक्राची रचना कशी आहे याची माहिती दिली आहे.
आणि सर्वात शेवटी डायरी सारखी काही कोरी पाने आहेत
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment