पुढारी दीपस्तंभ दिवाळी अंक २०२१ (Pudhari Deepastambh Diwali Edition 2021)



पुस्तक - पुढारी दीपस्तंभ दिवाळी अंक २०२१ (Pudhari Deepastambh Diwali Edition 2021)
भाषा - मराठी
पाने - २८८

हा दिवाळी अंक खूप लेख, थोड्या कथा आणि काही कविता असा भरगच्च मजकूर असलेला आहे. २ पानी लेख, थोडे मोठे लेख आणि काही दीर्घ लेख असे बरेच आहेत. त्यामुळे सगळ्या लेखांबद्दल लिहिणं कठीण आहे. अनुक्रमणिकेवरून विषयांचा अंदाज येईल.

अनुक्रमणिका






काही लेखांची झलक देतो.


कोरोना महामारी आणि लोकडाऊनमुळे अनेकांच्या नोरकरीवर, व्यवसायावर गदा आली. अनेकांना व्यवसाय बदलावे लागले, कमी उत्पन्नावर काम करावे लागले. अश्या ह्या बदलाबदलीच्या काळात ज्यांनी स्वतःत, स्वतःच्या उद्योगात खास बदल करून नवीन भरारी घेतली अश्या लोकांच्या यशोगाथा एका भागात आहेत. उदा. 




कोकणातल्या कातळशिल्प अथवा खोदचित्रांची ओळख करून देणारा दीर्घ लेख



ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक ह्यांच्या कार्यशैलीचा वेध घेणारा छोटा लेख


फेसबुक , व्हॉटसवपर तुम्हाला विनोदी चित्र येत असतील ज्यात एकदोन वेगवेगळी दृश्य आणि काही मजकूर टाकून धमाल विनोदी टिप्पणी केलेली असते. त्यांना मीम(meme ) म्हणतात.  (मला त्यासाठी सुचलेला शब्द म्हणजे मी त्यांना "थट्टाचित्र").  तर हे मिम्स नवीन पिढीच्या अभिव्यक्तीचा खास आविष्कार आहे. मराठीत अशी चित्र बनवणाऱ्या वैभव भिवरकर यांनी मिम्स म्हणजे काय, कशी तयार करतात वगैरे माहिती देणारा लेख लिहिला आहे. असाच एक लेख तरुणाईला भुरळ घालणाऱ्या गेमिंग इंडस्ट्री बद्दल आहे. 




या अंकात "कष्टकऱ्यांच्या कविता" अशी मध्यवर्ती कल्पना घेऊन नेहमीपेक्षा वेगळ्या कवींची कला सादर केली आहे.
कविता भाग मी टाळतोच. ह्यातला सुद्धा टाळलाच. 



एका आगामी कादंबरीचा काही भाग



भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ वर थोडीच पुस्तकं लिहिली गेली आहेत.  त्या पुस्तकांचा आढावा घेणारा एक लेख 



अंकांमधले छोटे लेख फारच त्रोटक वाटले तरी ते अनोख्या व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देतात. मध्यम आकाराचे लेख विषयाची फार वरवर माहिती देतात. दीर्घ लेख खरे माहितीपूर्ण आहेत. तुम्हाला बरेच लेख वाचायला आवडतील. 




———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :-  
आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-



———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:

Post a Comment

अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala)

पुस्तक - अनस्टॉपेबल अस. खंड १. माणसाने जग कसं जिंकलं ( Unstoppable Us Khand 1 Manasana Jag kasa jinkala) लेखक - युवाल नोआ हरारी (Yuval Noah ...