भाषा - मराठी
पाने - २०८
एबीपी माझा वृत्तवाहिनीने यावेळी पहिल्यांदाच दिवाळी अंक काढला आहे. राजीव खांडेकर संपादक आहेत. बरेच लेख, तीन कथा आणि थोड्या कविता असे या अंकाचे स्वरूप आहे.
अनुक्रमणिका
हे नाटक-सिनेमा क्षेत्रातील लोकांचे स्वानुभव किंवा त्यांच्याशी झालेल्या गप्पांचे शब्दांकन ह्या प्रकारचे बरेच लेख आहेत
- प्रसिद्ध दिग्दर्शक नागनाथ मंजुळे यांनी त्यांच्या लहानपणी अमिताभ बच्चन यांचे ते कसे चाहते झाले होते; काही वर्षांनी अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली त्या आठवणी सांगितल्या आहेत.
- "भारतीय डिजिटल पार्टी" अर्थात "भाडीपा" या नावाने युट्युब चॅनल तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. ह्या चॅनलची कलाकार मंडळी सुद्धा ताज्यादामाची पण वेगळ्या विचाराची तरुणच. ह्या चॅनलची सुरुवात आणि पुढचे प्लॅन्स ह्यावर एक लेख आहे
- कोर्ट", "डिसायपल" ह्या चित्रपटांच्या रूपाने पर चित्रपटात प्रयोग करणारे चैतन्य ताम्हाणे ह्यांचे मनोगत. "वाद चिरेबंदी" हे नाटक आणि त्याचे पुढचे व भाग अशी त्रिनाट्यधारा दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ह्यांनी सादर केली आहे. तिची जन्मकथा आणि सोबतचे अनुभव एका लेखात आहे.
- ऋध्दिकेश जोशी,मी वैभव मांगले, वैभव तत्त्ववादी आणि संकर्षण कऱ्हाडे हे अनुक्रमे कोल्हापूर, कोकण, नागपूर आणि परभणी इथून कलाक्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आले. आपलं मूळ गाव, तिथली संस्कृती, जीवनपद्धती, सुरुवातीला अनोळखी मुंबईत जाणवलेलं नवखेपण आणि आता तयार झालेला बांध याबद्दलच्या हलक्याफुलक्या आठवणी ह्या चौघांनी लिहिल्या आहेत.
सामाजिक विषयांवरचे लेख
- मुंबई-पुणे समृद्धी महामार्ग कसा आहे, त्याचे टप्पे, फायदे, सध्याची प्रगती ह्याचा सचित्र आढावा घेणारा लेख
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ह्यांची मुलाखत. त्यांच्या मंत्रालयामार्फत महामार्गांची काय काय कामे झाली; होत आहेत हे त्यांनी सांगितलं आहे
- स्वराज्य मिळालं तरी सुराज्य आलं असं आपण म्हणू शकत नाही. सामाजिक विषमता आणि कितीतरी प्रश्न भारतात आहेत. हे प्रश्न मांडणारे साईनाथ आणि पळशीकर ह्यांचे दोन लेख
व्यक्तिचित्रण लेख
- निरंजन घाटे यांचा अल्बर्ट आईन्स्टाईनच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती देणारा लेख
- मयुरी कांगो ही एकेकाळी बॉलिवूडमधली उभरती नायिका. पण ती सिनेसृष्टी सोडून पुन्हा अभ्यासाकडे वळली. एमबीए केलं अमेरिकेत मार्केटिंग क्षेत्रात जॉब केला आणि सध्या ती गुगल कंपनीची भारताची "इंडस्ट्री हेड" आहे. हा करियरबदल तिने का केला, तेव्हाचे आणि आत्ताचे तिचे स्वानुभव तिच्या लेखात आहेत.
पर्यटन विषयक लेख
- विक्रम पोतदार ह्यांनी पृथ्वीचे दोन्ही ध्रुव आणि सर्व खंडांमधल्या नाना ठिकानी निसर्ग छयाचित्रण केलं आहे. दुर्लभ म्हणता येतील अशी दृश्य त्यांनी टिपली आहेत. त्यात निसर्गाच्या मनमोहक रंग उधळणीचे चित्रण आहे तसेच वन्य प्राणी आणि पक्ष्यांचेही. अश्या काही चित्रांची जन्मकथा सांगितली आहे. एका क्लिक साठी कधी तासनतास तर कधी दिवसाचे दिवस कसं बसावं लागलं; काहीवेळा अनपेक्षित शॉट कसे मिळाले ह्या गमती जमती सांगितल्या आहेत.
- अन्नपूर्णा हे हिमालयातलं अवघड शिखर आहे. पुण्याच्या "गिरीप्रेमी" संस्थेच्या चमूने ह्यावर्षी ते सर केलं. त्या मोहिमेचे थरारक अनुभव त्या चमूचे सदस्य उमेश झिरपे ह्यांनी आपल्यासमोर खुले केले आहेत.
असा हा वेगवेगळ्या माहितीने नटलेला देखणा दिवाळी अंक आहे.
सामाजिक लेख हे विशेष आवडले नाहीत. त्यात लिहिलेल्या समस्या अजूनही तीव्र आहेतच पण लेख फक्त त्यांची उजळणी करतात. त्याबद्दल वेगळं असं काही लिहीत नाहीत. सध्याचं केंद्र सरकार त्यांच्या आवडीच्या पक्षाचं नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आडून आडून दोषारोप करणं त्यांनी सोडलेलं नाही.
गोष्टी लक्षात राहण्यासारख्या नाहीत.
मुक्तछंदातल्या कविता हा प्रकार मला व्यक्तिश: झेपत त्यामुळे तो भाग सुद्धा आवडला नाही.
बाकी बरेच लेख वरचेवर वाचण्यासारखे आहेत.
"समृद्धी महामार्ग", आईन्स्टाईन, मयुरी कांगो, फोटोग्राफी अनुभव, अन्नपूर्णा चढाई वरचे लेख आवर्जून वाचावेत असे वाटले.
त्या लेखांची ही झलक
"महाराष्ट्राच्या समृद्धीचा महामार्ग" लेखातील काही भाग
"अन्नपूर्णा प्रसन्न "
"माझा"ने माझी ह्या वर्षीच्या दिवाळी अंक वाचनाची सुरुवात चांगली झाली. विषयवैविध्याने नटलेल्या ह्या दिवाळी अंकात तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि कदाचित पूर्वी न वाचलेलं असं काही ना काही नक्की सापडेल.
———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
No comments:
Post a Comment