पुस्तक - Doongaji House (डूंगाजी हाऊस )
लेखक - Cyrus Mistry (सायरस मिस्त्री)
भाषा - English (इंग्रजी )
पाने - २४५
प्रकाशन - अलेफ बुक कंपनी, रूपा पब्लिकेशन्स इंडिया, २०२३
ISBN - 978-93-93852-73-1
छापील किंमत - रु. ५९९/-
सायरस मिस्त्री लिखित पुढील तीन नाटकांचा संग्रह आहे.
१) Doongaji House डूंगाजी हाऊस
२) A legacy of rage लिगसी ऑफ रेज
३) A flowering disorder अ फ्लॉवरिंग डिसॉर्डर
Doongaji House डूंगाजी हाऊस
पहिलं नाटक १९६० सालच्या मुंबईत घडतं. "डूंगाजी हाऊस" नावाची पारशी लोकांची इमारत आहे. इमारत जुनी जीर्ण झालेली आहे. तशीच कुटुंबही. बरेचसे म्हातारे लोकच इमारतीत राहिले राहिले आहेत. त्यातल्या एका पारशी कुटुंबात नाटक घडतंय. ह्या कुटुंबातला एक मुलगा पण परदेशी, एक दुसरीकडे आहे. प्रौढ नवरा बायको (होर्मुस आणि पिरोजा) आणि त्यांची मुलगी असे तिघे सध्या एकत्र आहेत. नाटकाच्या संवादातून लक्षात येतं की एकेकाळी धंदापाणी चांगलं असणाऱ्या होर्मुसचे सध्या मात्र हलाखीचे दिवस आहेत. त्याला कारण ठरलं ते एका जवळच्या नातेवाईकाने केलेली फसवणूक.

काय झालं होतं तेव्हा? कोणी फसवलं, का फसवलं? खरंच फसवलं का? आता जुने हिशेब, जुनी कौटुंबिक कटुता मागे सोडून पुन्हा नव्याने सुरूवात करायची का? ह्याबाद्दलचे प्रसंग अशी नाटकाची संकल्पना आहे. खूप नाट्य नाही. किंवा शेवटी खूप हाती लागलं असंही नाही. केवळ पारशी कुटुंबाचा एक अनुभव ह्या नाटकातून मिळाला एवढंच वेगळेपण.
मुंबईत झालेली पहिली दंगल हिंदू मुसलमान अशी नसून पारशी हिंदू अशी होती. त्याची एक आठवण. नाटकात वाचायला मिळते.
लिगसी ऑफ रेज A legacy of rage
हे नाटक वसईच्या "इस्ट इंडीयन" म्हणजे मराठी- ख्रिश्चन कुटुंबात घडतं. वृद्ध रॉबर्टच्या कुटुंबात त्याची सून, नातू, बहीण, बहिणीचा मुलगा आहेत. त्याचा मुलगा कित्येक वर्षांपासून कुवेतला गेला आहे तो परत येतंच नाही. सुनेला फक्त मनी ऑर्डर पाठवतो. पण स्वतःच्या बायकोमुलाला भेटायला सुद्धा येत नाही. रॉबर्टची मोठी जमीन आहे. पण सरकारी आणि न्यायालयीन लढाईत ती अडकली आहे. रॉबर्टच्या भाच्याचा त्यावर डोळा आहे. ही संपत्ती आपल्या घशात घालायचा तो कट करतो. रॉबर्टला त्याचा संशय आहे. पण मुलगा येईल आणि सगळा कारभार हातात घेईल ह्या आशेवर तो जगतोय. सगळ्या चिंता दारूच्या नशेत बुडवतोय. पुढे काय होईल? कट यशस्वी होईल? मुलगा परत येईल?
जॉर्जी (भाचा) फसवून रोबर्टच्या सह्या घेतो तो प्रसंग.
हे नाटक थोडं तरी उत्सुकता वाढवणारं होतं. नवनवे प्रसंग कथानक पुढे नेत होते.
३) A flowering disorder अ फ्लॉवरिंग डिसॉर्डर
हे नाटक पुन्हा पारशी कुटुंबात घडतं. प्रौढ पारशी दाम्पत्य. त्यांची काही वर्षांपूर्वीच लग्न झालेली मुलगी (रुखसाना) घरी आली आहे. ती विमनस्क, अस्थिर मानसिक अवस्थेत आहे. नवऱ्याचे बाहेर लफडे आहे त्यामुळे ती तशी झाली आहे. आईवडील तिला समजवायचा काय प्रयत्न करतात. तिला बरं वाटावं म्हणून डॉक्टरकडे, मांत्रिकाकडे नेतात. कुत्रा पाळतात. तिची आई तिला वडिलांच्या चक्रमपणाचे अनुभव सांगते. पण काही फरक पडत नाही. मग एके दिवशी अचानक फरक पडतो. तिला पुन्हा आयुष्य नव्याने जगावं असं वाटतं. तिचा नवरा तिला फोन करतो आणि ती घरी जायला तयार होते. संपलं नाटक.

तद्दन रटाळ. काही घडतंच नाही. विनाकारण प्रसंग आणि संवाद घातले आहेत. त्या प्रसंगातून काही तार्किक कथानक तयार होत नाही. नायिकेला अचानक नवऱ्याचा संशय येतो; आणि काही दिवसांनी अचानक विश्वास बसतो. "संशय" हाच "डिसॉर्डर" असं लेखकाला दाखवायचं असावं. पण ह्या संकल्पनेवर जुन्या "संशयकल्लोळ" पासून आजपर्यंत किती रंजक, विनोदी नाटकसिनेमे आले असतील ह्याला गणतीच नाही. त्यामुळे हे नाटक का लिहिलं आहे. आणि ते "निवडक नाटके" प्रकरच्या पुस्तकात का समविष्ट केलं हे देव जाणे!
रुखासाना आणि तिचे शेजारी आजोबा सोहराब ह्यांच्यातला संवाद.
पारशी समजात घडणाऱ्या घटनांचे चित्रण असणारे काहीतरी नवीन अनुभव देणारे पुस्तक असेल ह्या अपेक्षेने पुस्तक वाचत राहिलो. पण तसं हाती काही लागलं नाहीच, गोष्टीची मजा पण आली नाही.
ह्या एका पुस्तकावरून पारशी-इंग्रजी भारतीय रंगभूमी बद्दल काही मत बनवणं चुकीचं आहे. पण ही नाटकं अशीच होती का ? जाणकार सुजाण वाचकांनी/प्रेक्षकांनी आपलं मत सांगावं.
——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-
———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )

No comments:
Post a Comment