पुस्तक - हास्यमुद्रा (Hasymudra)
लेखक - मुकुंद टाकसाळे (Mukund Taksale)
भाषा - मराठी (Marathi)
पाने - २३६
मुकुंद टाकसाळे यांच्या विनोदी कथांचा हा संग्रह आहे. मध्यमवर्गीय मराठी माणासांच्या घरी घडणाऱ्या घडू शकणाऱ्या छोट्या छोट्या घटनांमधून, गमतीजमतीतून प्रसंग खुलवले आहेत. चारुहास पंडित यांची कथांना साजेशी व्यंगचित्रे या गोष्टींना अजूनच खुलवतात.
अनुक्रमणिका -
टकले अंकलची ट्रॅजेडी - रोजचा पेपर टाकणारा पोऱ्या चुकीचा पेपर टाकतोय म्हणून त्याला सकाळी गाठून निरोप सांगायचा. इतकी साधी गोष्ट; पण एकातून एक गोंधळ कसा घडतो आणि तो निस्तरताना अजून काय गोंधळ घडतो. ते सांगणारी कथा. "तारक मेहता का ऊल्टा चष्मा" ची आठवण येईल.
हिप्नोटिझम - संमोहन करून माणसाला वश करता येतं,त्याच्या कडून हवं ते करवून घेता येतं, त्याच्या मनातलं काढून घेता येतं असं म्हणतात. पण खरंच कोणी मनातला राग उघड उघड बोलला तर कठीण प्रसंग ओढवतो. आणि अशातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा हिप्नोटिझम कसं कामी आलं याची गोष्ट.
कबूतर जा जा जा - घरात घुसलं कबूतर आणि घरच्यांची पळापळ
नाट्यपरीक्षक काकाजी - तऱ्हेवाईक नाट्यपरीक्षकाचा नमुना आणि त्याच्या तऱ्हा
सखूची डायरी - समाजसेवा म्हणून आपल्या मोलकरणीला लिहालया शिकवणारी मालकीण आणि ही मोलकरीण मग "काय काय" लिहून ठेवते याची धमाल
शिंकामोर्तब - बोलताना आपण काही विधान केलं आणि तेवढ्यात कोणी शिंकलं तर आपण "सत्य आहे" असं म्हणतो. या योगायोगामुळे कथा नायकाचं लग्न ठरतं का आणि शिंका गेल्यावर मोडतं की काय; बघा वाचून.
चोरीचा मामला - इन मीन चार बिऱ्हाडं असणाऱ्या सोसायटीत चोरी होते - चपलांची, बादल्यांची. आणि त्यातून या सभासदांचे तात्विक वाद होतात, वॉचमन ची योजना होते आणि फसते !
मरावे परी ... - एका होतकरू अभिनेत्याचा स्ट्रगल
लॅचकी चं रामायण - किल्ली घरात आणि आपण बाहेर. आणि पुढचा गोंधळात गोंधळ.
हात दाखवून अवलक्षण - स्वीमिंग पूल मध्ये पोहताना एका गृहस्थाला आपली जुनी मैत्रीण दिसली. तिला हात दाखवून "हाय" केलं पण. तिच्या नवऱ्याला कळल्यावर "हाय रे कर्मा" म्हणायची पाळी आली.
देणे-घेणे - साहित्यिक संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी खरंच साहित्यप्रेमी आणि प्रामाणिक असतील असं नाही. अशा लोकांच्या बेजबाबदार कारभारामुळे एखाद्या होतकरू लेखकाचीच कारकीर्द संपू नये. पण इथे असं झालं खरं.
टीव्ही व्हिडिओ वर्ल्ड - या गोष्टीला पण ९० च्या दशकातल्या मालिका, केबल टीव्हीचे वाढते प्रमाण आणि टीव्ही-सिनेमात गुंग झालेली माणसं याची पार्श्वभूमी आहे. त्याचाच वापर करून लग्न जमण्याची ही गोष्ट आहे.
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment