पुस्तक - जपानी लघुकथा भाग एक, दोन (Japani laghukatha Part 1& 2)
लेखिका -सुजाता गोखले (Sujata Gokhale)
भाषा -मराठी (Marathi)
पाने - प्रत्येक भागात ९४
प्रकाशन - आदिती अकॅडमी ऑफ जपानी लँग्वेज (भाग एक जानेवारी २०२४, भाग दोन मार्च २०२५)

छापील किंमत - रु. ४००/- प्रत्येकी
ISBN - भाग एक 979-889233677-2
भाग दोन 979-889744249-2काही दिवसांपूर्वी "ऋणानुबंध पूर्वेचा" ह्या पुस्तकाचं परीक्षण लिहिलं होतं. त्याच्या लेखिका सुजाता गोखले ह्या जपानी भाषेच्या शिक्षिका आहेत. त्यांनी बऱ्याच वेळा शैक्षणिक कामाच्या निमित्ताने जपानला भेटी दिल्या आहेत त्या अनुभवांवरचं ते खूप सुंदर पुस्तक आहे. (त्याच्या परिक्षणाची लिंक https://learnmarathiwithkaushik.com/courses/runanubandh-purvecha/ ). त्या पुस्तकाचं परीक्षण लिहिल्यानंतर मला सुजाताजींना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली. आणि त्यांनी पुस्तकाचे पुढचे भाग आणि अजून काही पुस्तकं मला भेट दिली. त्यातलीच ही दोन पुस्तकं "जपानी लघुकथा- भाग एक आणि दोन"
.jpg)
पुस्तकाचं नाव वाचून असा समज होऊ शकतो की हे एक भाषांतरित पुस्तक असेल. जपानी भाषेतल्या लघुकथा किंवा पारंपारिक जपानी लोककथांचे भाषांतर या पुस्तकात असेल. पण हे पुस्तक तसं नाही. या सुजाताजींनी स्वतः स्वतंत्रपणे लिहिलेल्या गोष्टी आहेत. जपान, जपानी भाषा आणि जपानी संस्कृती यांच्यावर त्यांचे प्रेम आहे. त्या सर्वांची त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि इतर सर्वसाधारण वाचकांनाही ओळख व्हावी यासाठी त्यांनी या कथा लिहिलेल्या आहेत. या गोष्टींमधली पार्श्वभूमी जपानची आहे. पहिल्या काही गोष्टींमध्ये एखाद दुसरे भारतीय पात्र आणि बाकी जपानी पात्रं अशी रचना आहे. नंतर बहुतेक गोष्टी मधली सगळी पात्रं जपानीच आहेत. ह्या गोष्टींतून जपान मधले एखादे ठिकाण, एखादी परंपरा किंवा त्या लोकांची विचार करण्याची पद्धत, जगण्याची पद्धत असं आपल्याला आपसूक जाणवतं. गोष्टीत जेव्हा जपानी शब्द येतात तेव्हा कंसात त्याचा अर्थ सांगितला आहे. जपानी संस्कृतीची ओळख करून देणे हा विचार असला तरी या गोष्टी कुठेही डॉक्युमेंटरी पद्धतीच्या अशा झालेल्या नाहीत. बहुतेक गोष्टी या फॅन्टसी(कल्पनारंजन) या प्रकारातल्या आहेत. तर एकदोन रहस्य कथांसारख्या. त्यामुळे त्या रंजक आहेत. खरंच असं घडलं तर काय होईल, कसं वाटेल असा मजेशीर विचार मनात सोडणाऱ्या आहेत.
दोन्ही भाग मिळून 22 कथा आहेत. सगळ्या गोष्टींबद्दल सांगत नाही पण मला इंटरेस्टिंग वाटलेल्या गोष्टींपैकी सात-आठ गोष्टींबद्दल सांगतो.
तो - पुण्यात राहणाऱ्या एका महिलेच्या घरी अचानक एक जपानी तरुण मुलगा येतो. अस्खलित मराठी बोलत असतो. येताना त्याने त्या बाईंसाठी जपानमधून छान छान भेटवस्तू आणलेल्या असतात असतात. हा तरुण कोण असेल हे गोष्टीच्या शेवटी कळतं एका फॅन्टसीच्या स्वरूपात. एक फॅन्टसी लघुकथा म्हणून आहे ती वाचायला इंटरेस्टिंग आहे. तो जपानी मुलगा ज्या वस्तू घेऊन येतो त्या वस्तूंचा जपानी संस्कृतीतला अर्थ काय हे गोष्टीच्या ओघात येतं, त्यातून जपानची ओळख होते.
तो मी नव्हे - ही जपानमध्ये घडणारी एक रहस्य कथा आहे. ती घडते एका जपानी पुस्तकांच्या दुकानात जिथे पुस्तक विकतही घेता येतात, बसून वाचता येतात. एक वाचक तिकडे नेहमी येत असतो. अचानक त्याचं येणं थांबतं. काय झालं असेल? काय रहस्य असेल ?
"बंदिस्त" आणि "निंजा" - या दोन गोष्टीत पर्यटक एका विशिष्ट ऐतिहासिक स्थळाला भेट द्यायला जातात. कथेच्या ओघात "हिमेजी किल्ला" आणि त्याचा इतिहास, निंजा योद्ध्यांची घरे ह्यांची माहिती कळते आणि शेवट पुन्हा एकदा अद्भुत चमत्कारिक होतो.
"लाट"- या गोष्टीमध्ये एक लेखक एक गोष्ट लिहितो आहे. अगदी काल्पनिक. पण जेव्हा तो प्रकाशकाला भेटायला जातो तेव्हा कळतं की ते सगळे प्रसंग खरेखुरे घडलेले आहेत. पण मग गोष्टीचा शेवट जसा लेखकाने केला आहे तसंच पुढे घडणार का ?
"घड्याळ" - एक जुनंपुराणं घड्याळ दुरुस्तीचं दुकान आहे. त्या दुकानात खूप घड्याळं दिसत आहेत. इतक्या लोकांनी घड्याळात दुरुस्तीला टाकली, ती दुरुस्त झालेली आहेत तरी लोकांनी परत का नेली नसतील?
निवा - जपानी भाषेत निवा म्हणजे घराभोवतालची बाग. अशी बाग बनवण्याचं कंत्राट घेणाऱ्या माणसाला घरमालकाची मुलगी भेटते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. पण पुढे काही चमत्कारिक गोष्टी घडतात आणि या गोष्टीतली फॅन्टसी आपल्यासमोर येते.
शिबा इनु - "शिबा इनु" ही जपान मधली कुत्र्यांची एक जात आहे. कोल्ह्यासारखी दिसणारी तगडी जात. या गोष्टीतला नायक एका लॉजवरती राहायला उतरतो तेव्हा त्याच्याकडे एक शिबा इनु कुत्रा येतो. कुत्रा चक्क माणसाच्या आवाजात बोलू लागतो. कुत्रा माणसाच्या आवाजात कसा बोलेल? काय असेल ही जादू? त्या कुत्र्याचं याच्याकडे काय काम?

पाचिंको - मशीन द्वारे खेळाच्या जुगारातल्या एका दुकानातली ही गोष्ट. चीनमधनं जपानमध्ये पळून आलेली तरुणी या दुकानात काम करायला लागते लोकांनी जुगारात हरलेले पैसे हीच या दुकानाची कमाई. तिला स्वतःला पैशाची गरज आहे आणि लोक जुगारात हरून निराश होतायत हेही दिसतंय. या दोन्हीचा मेळ कसा बरं साधला जाईल?
आता काही पाने उदाहरणादाखल.
लेखिकेची पुस्तकात दिलेली माहिती

अचानक आलेल्या जपानी तरुणाने काय काय भेटवस्तू आणल्या होत्या बघा.

निंजाच्या घराला भेट
प्रियकराने केला प्रेयसीचा खून... पुढच्या अद्भुत अनुभवाची नांदी

फुग्यासारखा फुगणारा फुगू मासा विषारी असतो. पण तरी जपानी लोक खातात. एका हॉटेलात हा फुगू मासा शेफशी बोलू लागतो तेव्हा.

शीर्षकातच म्हटलं आहे तसं त्या लघुकथा आहेत. पुस्तकातल्या अक्षरांचा आकार(फॉन्ट साईज) जरा नेहमीपेक्षा मोठा आणि मांडणी सुटसुटीत आहे म्हणून त्या सात आठ पानांच्या दिसतात. नेहमीच्या पुस्तकाच्या टाईप मध्ये तर त्या अजून लहान होतील. त्यामुळे त्या लघुकथाच आहेत. वाचायला मजा येते. गोष्टी सलग वाचल्या की त्यांचा साचा/पॅटर्न लक्षात येतो की... गोष्टींमधल्या व्यक्ती एकमेकांशी भेटतात बोलतात पण गोष्टीच्या शेवटी अचानक त्यातल्या एखाद्या पात्राचं अस्तित्व हा भास असतो, ती व्यक्ती आधीपासूनच मेलेली असते. त्या दृष्टीने कथबीजाची पुनरुक्ती फार झाली आहे. त्यात काही वेगळेपणा आणता आला तर या कथांची रंजकता वाढेल असं मला वाटतं. तरी प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीत घडते आहे आणि त्यातून नवीन जपानी शब्द, संकल्पना कळतात. प्रत्येक गोष्ट आपण उत्सुकतेने वाचतो.
मराठी भाषेत इतर भाषेतून भाषांतरित झालेली पुस्तकं बरीच आहेत. परदेशाची प्रवासवर्णनं खूप आहेत. अभ्यासपूर्ण लेखसंग्रह आहेत. पण त्यापेक्षा वेगळं, स्वतःच्या प्रतिभेतून काहीतरी निर्माण करून, ललित अंगाने परदेशी संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा प्रकार मला आगळावेगळा वाटला. याआधी असे प्रयोग मराठीत झाले आहेत का हे अभ्यासक सांगू शकतील. हा प्रयोग अगदी पहिलाच नसेल तरीही फार कमी लोकांनी केलेला हा प्रयोग आहे. तो सुजाताजींनी चांगलाच पेलला आहे.
पुस्तकाचं नाव काहीतरी वेगळं असावं असं मला सारखं वाटतंय. "जपानी लघुकथा" या नावाने जो "भाषांतरित गोष्टी" असा भाव मनात येतोय, तो टाळण्यासाठी जपानशी संबंधित एक दोन शब्दांचं शीर्षक चांगलं वाटेल.
मराठीत एक वेगळी वाट मराठी वाचकांना दाखवल्याबद्दल सुजाताजींचे एक वाचक म्हणून आणि एक मराठी भाषाप्रेमी म्हणून मनापासून आभार मानतो. त्यांनी असंच लिहित राहावं, प्रयोग करत राहावेत व त्यात त्यांना यश मिळावं अशा खूप शुभेच्छा. सुजाण वाचकही ही पुस्तकं वाचून त्यांच्या प्रयत्नांना दाद देतील, अभिप्राय कळवतील आणि त्यातून मराठी कथाविश्व अजून समृद्ध होईल अशी मी आशा करतो.

——————————————————————————-
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- जवा ( जमल्यास वाचा )———————————————————————————-

———————————————————————————-
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
———————————————————————————-

No comments:
Post a Comment