खाली डोकं वर पाय (khali doka var pay)


सुट्टी वार्षिकांक : खाली डोकं वर पाय (khali doka var pay) 
भाषा : मराठी (Marathi)
संपादक श्रीरंग गोडबोले (Shrirang Godbole)
पाने : २००
किंमत : १०० रु

मराठी मनोरंजन क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या झी मराठी वहिनीने या उन्हाळ्याच्या सुट्टीत नवीन प्रयोग केला आहे. लहान मुलांसाठी "खाली डोकं वर पाय" नावाचा सुट्टी वार्षिकांक काढला आहे. 

मासिक लहान मुलांसाठी असलं तरी मुलांना वाचनाची गोडी लागवी यासाठी कोणीतरी प्रयत्न करतंय म्हटल्यावर माझ्यासारख्या वाचनप्रेमीला बरंच वाटलं. झी मराठीचे सर्व उपक्रम अगदी आकर्षक, देखणे असतात. त्यात झी मराठी वरून या अंकाची सारखी जाहिरातही होत होती. त्यामुळे या आंकाबद्दल उत्सुकता वाटत होती. नातेवाईकांकडे हा अंक बघितल्यावर चाळायचा, वाचायचा आणि त्या बद्दल माझ्या परीक्षणवाचकांना या बद्दल सांगायचा मोह आवरला नाही. 

दोनशे पनी अंक गुळगुळीत कागदावर रंगित, आकर्षक छपाईचा आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकायात गोष्टींवर मुख्य भर आहे - विनोदी, वैज्ञानिक, बोधकथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. परेश मोकाशी, चिन्मय मांडलेकर, संजय मोने इ. सुपरिचित व्यक्तींनी लिहिलेल्या गोष्टी हेत. राजाराणीच्या, प्राण्यांच्या, पौराणिक अशा बाळबोध गोष्टी न देता आजच्या जमान्यातल्या गोष्टी आहेत.

राजीव तांबे यांनी लिहिलेलं नाटुकलं आहे. 
दिलीप प्रभावळकरांनी त्यांचा अनुभ सांगितला आहे

एक चित्रकथा आहे. 


ओरिगामी करून निरनिराळ्या ५-६ वस्तू बनवायची सचित्र कृती आहे. सावल्यांचे खेळ कसे करायचे ते सचित्र दिलं आहे. 


"मी खाल्लेला मार" हे एकपानी ७ लेख आहेत ज्यात प्रसिद्ध व्यक्तींनी त्यांना लहानपणी मार का खावा लागला याचा किस्सा सांगितला आहे. 


तीन-चार माहितीपर लेखही आहेत. उदा. मुंबईत रेल्वे वेळापत्रक आणि गाड्या वेळेवर धावतायत का नाही याची माहिती देणारं ऍप एम-इंडिकेटर प्रसिद्ध आहे. त्याचा निर्मात सचिन टेके याने या ऍप च्या निर्मितीबद्दल सांगितलं अहे. विमानांची निर्मिती करणारे अमोल यादव यांनी त्यांच्या उपक्रमाबद्दल लिहिलं आहे. राजीव तांब्यांचा अभयाराण्यावरचा लेख आहे. 
असे काही लेख मोठ्यांनाही वाचावेसे वाटतील. प्राथमिक शाळेतल्या मुलांना हा अंक वाचायला आवडेल. निरागस, निखळ मनोरंजन हल्ली मिळणं कमी झालं आहे त्यावर उपाय म्हणून असे बालमासिकांचे अंक निघणं, मुलांनी ते वाचणं आणि त्यासाठी पालकांनी ते त्यांच्या पर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. माझ्या अगदी लहानपणचीच्या चंपक, ठकठक, चांदोबा या गोष्टींच्या मासिकांची आणि किशोर, टॉनिक अश्या अजून प्रगल्भ मासिकांची आठवण झाली. ही नियतकालिकं अजूनही निघत असतीलच पण हल्ली कमी दिसतात. झी मराठी च्या या अंकामुळे बालमासिकांमध्ये आकर्षकपणा आणि जोरकस मार्केटिंग नव्याने रुजावे; मुलांमधली वाचनाची आवड वाढीला लागावी अशीच अपेक्षा. ----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी  :- लहान मुलांनी जवा ( जमल्यास वाचा )
----------------------------------------------------------------------------------


----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक  )
----------------------------------------------------------------------------------

1 comment:

  1. अप्रतिम. खूप सविस्तर आहे. मला वाटते श्रेणी आवा हवी होती.

    ReplyDelete

नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar)

पुस्तक - नरभक्षकाच्या मागावर (Narabhakshakachya Magavar) लेखक - केनेथ अँडरसन Kenneth Anderson अनुवादक - संजय बापट (Sanjay Bapat) भाषा - मराठ...