पुस्तक : कोंदण (Kondan)
लेखन : श्रीकांत लागू (Shrikant Lagu)
भाषा : मराठी (Marathi)
पाने : १६८
ISBN : 978-93-80361-25-0
"लागू बंधू हिरे-मोती" या पेढीचे संचालक असणऱ्या श्रीकांत लागूंच्या हरहुन्नरी, प्रचंड कुतूहल आणि साहसी व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्याला या पुस्तकातून होते. त्यांची ओळख आधी करून घेऊया.
त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त त्यांच्या निवडक लेखांचा हा संग्रह केला आहे. त्यातून त्यांनी केलेली भटकंती, वेगवेगख्या ठिकाणांहून बघितलेली ग्रहणं, कलाक्षेत्रातल्या मुशाफिरी, त्यातून जमलेल्या स्नेहसंबंधांचे अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. कैलास-मनससरोवर चा प्रवास (८० च्या दशकातला), ९२ सालाआधी अयोध्येला दिलेली भेट- आणि एका चिकित्सकाच्या नजरेतून तिचं वर्णन, सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव, जगातल्या मोठमोठ्या धबधब्यांना दिलेल्या भेटी, पहिले एव्हरेस्टवीर एडमंड-नॉरगे नसून दुसरे आहेत याबद्दल होणऱ्या चर्चेची ओळख, इशान्य भारतातल्या प्रवासाचा एक अनुभव असे लेख आहेत. विविध रत्नांची तोंडओळख करून देणारा एक लेख आहे. अनुक्रमणिकेवर एक नजर टाकूया. लेखांच्या शीर्षकावरून विषयांची कल्पना येईल.
ग्रहणाबद्दलच्या लेखातला एक भाग
एकूणच सगळे लेख माहितीपुर्ण आहेत. अनुवादित कथा पण फॅंटसी प्रकारच्या आहे. वाचायला छान आहे.
----------------------------------------------------------------------------------
मी दिलेली पुस्तक श्रेणी :- वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
----------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------
आवा ( आवर्जून वाचा )
जवा ( जमल्यास वाचा )
वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )
नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )
---------------------------------------------------------------------------------











































